ऑनलाइन लोकमत कोल्हापूरात पंचगंगा पात्राबाहेर, गगनबाबडा तालुक्यात सर्वाधिक १८९.५० मिमी पाऊस गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 87 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक गगनबाबडा तालुक्यात 189.50 मि.मी पाऊस पडला आहे. धरणक्षेत्रात सुरु असलेल्या पावसामूळे नद्यांच्या पातळीत वाढ होऊन कोल्हापूरातील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 29 फूट 4 इंचावर पोहचली आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर व भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, शिरगाव, खडक कोगे व सरकारी कोगे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुळा नदीला पूरभंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील घाटघर रतनगड येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवार सकाळ सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार घाटघरला ३६० मिमी तर रतनवाडीला ३१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. साकुर-मांडवे पुलापर्यंत पाणी पोहोचले असून, संगमनेर व पारनेर तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.हरिश्चंद्रगड परिसरात मुसळधार आषाढ सरी कोसळत असून मुळे नदीला मोठा पूर आला आहे. भंडारदरा धरणात गेल्या २४ तासात एक टी एम सी म्हणजे १ हजार दशलक्षघनफुट विक्रमी पाण्याची वाढ झाली आहे. सकाळ पासून पावसाचा जोर वाढला आहे. तालुक्यात पहाटे पासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु असून भंडारदरा धरण सायंकाळपर्यंत ४० टक्के भरण्याची शक्यता आहे. निळवंडे धरणाचा पाणी साठा ८५० दशलक्षघनफुट इतका झाला आहे. नाशिकनाशिकमध्ये संततधार पाऊस, शहराचे जनजीवन विस्कळीत. गंगापुर आणि दारणा धरणातील पाणी पातळीत वाढ.नाशिक संततधार पावसामुळे गंगापूर धरण 36 टक्के तर दारणा धरण 42 टक्के भरले. जुन्नरजुन्नर तालुक्यातील ओतुरला ढग फुटी गुरव ठीके या भागातील जमीन वाहून गेली. मांडवी नदीला महापूर शेती घरे बंगले गुरे व गोठे पाण्यात. जुन्नर च्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचे थैमान. कुकडेश्वर येथील पुलाचा भराव गेला वाहून. आदिवासी भागातील जवळपास 10 गावांची संपर्क यंत्रणा धोक्यात. घाटघर कडे कुकडेश्वर मारगे जाणारी एस. टी. बससेवा झाली बंद. खामगावजळगाव - जामोद तालुक्यातील आसलगाव येथे भिंत अंगावर पडल्याने वृद्धेचा मृत्यु, पावसामुळे अनिल पाटील यांच्य घराची भिंत पडली, या घटनेत कमलाबाई हरिभाऊ नारखेडे या महिलेचा मृत्यू झाला. चंद्रपूरचंद्रपुरात इंडीका कार नाल्यात पडली. कोठारी ते येनबोडी दरम्यान किन्ही पुलावरुन जात असताना कार नाल्यात पडली. गाडीमधील चौघे बेपत्ता असून, तिघे शिक्षक आहेत. पोलीसांची शोध मोहीम सुरु आहे.