Master Blaster participated in 'Cleanliness Service' campaign
मास्टर ब्लास्टरने घेतला ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सहभाग By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 2:29 PM1 / 5पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सहभाग घेतला. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर तसंच युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनीही या अभियानात सहभाग घेतला.2 / 5 आज पहाटे पाच वाजता हाती झाडू घेऊन सचिन तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे बॅण्डस्टॅण्ड परिसरात साफसफाई केली.3 / 5प्रत्येक नागरिकाने आपला देश हे आपलं घर समजून स्वच्छ करावं, असं आवाहन सचिन तेंडुलकरने यावेळी केलं. 4 / 5लोकांनी कुठेही कचरा फेकू नये. आपलं शहर, आपली भूमी आपणच स्वच्छ ठेवायला हवी, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे5 / 5पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांचं ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात सहभाग घेतल्याबद्दल कौतुक केलं. आणखी वाचा Subscribe to Notifications