A minister will resign with the existing 5 MLAs in the state after lok sabha results
राज्यातील विद्यमान 5 आमदारांसह एका मंत्र्याला द्यावा लागणार राजीनामा By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 5:15 PM1 / 6लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये विधानसभेच्या सहा आमदारांना दिल्लीतील लोकसभेत जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या आमदारांना राजीनामा द्यावा लागणार आहे. यामध्ये मंत्री गिरीष बापट यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या मोहन जोशींचा यांचा पराभव करुन विजय मिळविला आहे. 2 / 6हिंगोली लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या सुभाष वानखेडे यांचा शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी पराभव केला आहे. 3 / 6औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातन एमआयएमचे आमदार असलेले इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला आहे. 4 / 6नांदेड लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पराभव केला.5 / 6जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार असलेले उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकारांचा पराभव केला आहे6 / 6तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर ज्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपाचे केंद्रीय मंत्री हंसराज आहिर यांचा पराभव केला. राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications