minster raosaheb danave patil work on lockdow in home MMG
महाराष्ट्राचे 'दाजी', चुलीवर बनवताहेत भाकरी अन् भाजी By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 2:08 PM1 / 9केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांची सोशल मीडियावर वेगळीच क्रेझ आहे, सध्या लॉकडाऊन कालावधीत त्यांनी चक्क रेशन दुकानावर धडक मारली2 / 9लॉकडाऊन असल्याने सध्या घरीच बसून दानवे यांना मंत्रालयाच्या कामाचा आढावा घ्यावा लागत आहे, त्यामुळे ते घरी बसून स्वत: लॅपटॉपच्या सहाय्याने आपलं कामकाज करत आहेत3 / 9ज्या प्रमाणे मी घरात आहे, तसंच नागरिकांनीही घरातच रहावे, असे आवाहन दानवे पाटील यांनी महाराष्ट्रातील जनेतला केलं आहे. विशेष म्हणजे आपला मराठवाड्यातील गमछा तोंडाला बांधून त्यांनी त्याला मास्क बनवलाय4 / 9लॉकडाऊन काळात गरिबांना व गरजूंना अन्न आणि फळे अशी मदत पाटील यांनी केली. 5 / 9कोरोनापासून बचाव करण्यासाठी अत्यावश्यक सेवेत कार्य करणाऱ्यां कर्मचाऱ्यांना रावसाहेबांनी मास्क वाटप केलं, तोंडाला मास्क लावूनच घरातून बाहेर पडण्याचं त्यांनी सांगितलंर6 / 9रावसाहेब दानवे पाटील यांचे फोटो म्हणजे सोशल मीडियावर सेन्सेशन असते, चाहत्यांना ते फोटो खूप आवडतात म्हणूनच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. 7 / 9यापूर्वी रंगपंचमी दिवशी बगिचामध्ये व्यायाम करताना रावसाहेब दानवे पाटील यांचा फोटो व्हायरल झाला होता, आता चक्क स्वयंपाकात मदत करताना ते दिसत आहेत.8 / 9रावसाहेब दानवे पाटील यांना नेटीझन्स लाडाने आणि हक्काने दाजी म्हणतात, महाराष्ट्राचे ते लाडके दाजी बनले आहेत.9 / 9लॉकडाऊन काळात आपल्या पत्नीसोबत त्यांनी स्वयंपाक केला. यावेळी, चुलीवर भाकरी अन् भाजी बनविण्याचा आनंद त्यांनी घेतला. आणखी वाचा Subscribe to Notifications