MLA of Eknath Shinde group in BJP?; A hint of the upcoming political future
एकनाथ शिंदे गटाचे आमदार भाजपात?; आगामी राजकीय भवितव्याचे दिले संकेत By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 1:41 PM1 / 9राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंशी फारकत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपाला पाठिंबा देत राज्यात सत्तांतर घडवलं. या घडामोडीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ४० आमदारांसह एकूण ५१ आमदारांनी साथ दिली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. 2 / 9एकनाथ शिंदे गटाने आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही तर आमचा नेता बदलला आहे असं सांगत शिवसेनेवरच दावा केला आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाने अर्ज केला आहे. तर शिंदे गटाच्या अर्जाला ठाकरे गटाने प्रतिआव्हान दिले आहे. सध्या खरी शिवसेना कुणााची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. 3 / 9त्यात आमदारांनी वेगळा गट बनवला तरी त्यांना इतर राजकीय पक्षात विलीनकरण केल्याशिवाय पर्याय नाही असा युक्तिवाद सातत्याने ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात मांडला जात आहे. मात्र बहुतांश आमदार, खासदार आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे आम्हाला विलीनकरणाची गरज नाही असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. 4 / 9जर भविष्यात शिंदे गटाच्या आमदारांवर विलीनकरणाची वेळ आली तर त्यांना प्रहार, मनसे आणि भाजपात जावं लागू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र भंडारा येथे झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे स्थानिक आमदारही उपस्थित होते. परंतु या कार्यक्रमातील एका बाबीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 5 / 9भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी कार्यक्रमात उपस्थिती लावत थेट भाजपाचं उपरणं गळ्यात घातलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या बाजूलाच भोंडेकर बसले होते. त्यांच्या गळ्यातील भाजपाचं उपरणं पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. शिंदे गटाचे आमदार भाजपात जाणार की आगामी राजकीय भवितव्याचे हे संकेत आहेत? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला. 6 / 9या कार्यक्रमात नरेंद्र भोंडेकर यांनी फडणवीसांचं कौतुक करत म्हटलं की, मी देवेंद्र फडणवीसांना गुरू मानतो. फडणवीसांमध्ये राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. भविष्यात भंडारा नगरपरिषदेत भाजपाची सत्ता असेल असंही त्यांनी म्हटलं. 7 / 9 नरेंद्र भोंडेकर हे भंडाऱ्याचे अपक्ष आमदार असून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत भोंडेकर यांनी सूरत, गुवाहाटीला जाणे पसंत केले. भोंडेकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे स्थानिक शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते. तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. 8 / 9नरेंद्र भोंडेकर म्हणाले होते की, मातोश्रीच्या आशीर्वादाने आमदार झालो असतो तर सर्वच निवडून आले असते. कामे करणारे लोक निवडून येतात. आम्ही जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलोय. मुख्य प्रक्रियेत कायम एकनाथ शिंदे यांना डावलण्याचा आरोप करत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार जनतेसाठी काम करेल असा विश्वास व्यक्त केला होता. 9 / 9सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, तुम्ही दोन तृतीयांश असला तरी मूळ पक्षावर दावा करू शकत नाही. दोन तृतीयांश पक्ष असलेल्या दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकता. दोन तृतीयांश लोक दुसर्या पक्षात विलीन होणे किंवा नवीन पक्ष स्थापन करणे हा एकमेव मार्ग आहे असं त्यांनी म्हटलं. आणखी वाचा Subscribe to Notifications