शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चंद्रपूर: आईसमोर 5 वर्षीय चिमुकलीला बिबट्यानं पकडलं जबड्यात, नंतर झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 4:52 PM

1 / 9
चंद्रपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पाच वर्षीय मुलीला वाचवण्यासाठी आईने चक्क बिबट्याशी सामना केला. अखेर बिबट्यालाही या आईसमोर हार मानावी लागली.
2 / 9
चंद्रपूरजवळील जुनोना गावात अर्चणा नावाची महिला आपल्या पती आणि मुलीसोबत राहता. अर्चणा गावाजवळ असलेल्या जंगलात जंगली भाज्या आणण्यासाठी गेल्या होत्या.
3 / 9
यावेळी अचानक बिबट्याने अर्चणा यांच्या पाच वर्षीय मुलीवर हल्ला केला. बिबट्याने त्या चिमुकलीचे डोके आपल्या जबड्यात पकडले आणि तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
4 / 9
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अर्चणा यांना काय करावं, काही सुचनत नव्हतं. पण, अखेर त्यांनी हिम्मत करुन एक काठी उचलली आणि बिबट्यावर हल्ला सुरू केला.
5 / 9
आपल्यावर हल्ला होताच बिबट्याने अर्चणा यांच्या मुलीला सोडले आणि त्यांच्यावर हल्ला केला. अर्चणा यांनी कसेबसे स्वतःला बिबट्याच्या तावडीतून सोडवले.
6 / 9
यावेळी बिबट्याने पुन्हा अर्चणा यांच्या मुलीवर हल्ला चढवला आणि तिला जंगला घेऊन गेला. अर्चणाही बिबट्याच्या मागे गेल्या आणि त्याच्यावर काठीने हल्ला करुन मुलीला त्याच्या तावडीतून सोडवले.
7 / 9
अर्चणा यांची हिम्मत पाहून अखेर बिबट्याने हार मानली आणि जंगलात पळ काढला. दरम्यान, हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकली जखमी झाली. तिच्या शरीरावर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या.
8 / 9
अर्चणा यांनी स्वतःला सावरले आणि जखमी मुलीला घेऊन गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्या. येथे प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी नागपूरमध्ये नेण्यात आले.
9 / 9
अर्चणा यांचे पती संदिप मेश्राम यांनी सांगितले की, बिबटे अनेकदा बकरीच्या शिकारीसाठी येत असतात. पण, यावेळेस त्याने माझ्या मुलीवर हल्ला केला. पण, माझ्या पत्नीने मोठी हिम्मत दाखवली आणि आमच्या मुलीला वाचवले.
टॅग्स :chandrapur-pcचंद्रपूरleopardबिबट्याnagpurनागपूर