शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mumbai Bandh : पाहा 'मुंबई बंद'चे शहरभरातील पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 4:42 PM

1 / 13
मुंबई- सकल मराठा समाजानं सुरू असलेला बंद स्थगित केला आहे. मोर्चेक-यांकडून शांतता राखण्याचं आवाहनही सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी केलं आहे. मुंबई व उपनगरांत पुकारलेला बंद संपवण्यात आला आहे.
2 / 13
तसेच मुंबई बंदला मुंबईकर आणि व्यापा-यांनी दिलेल्या प्रतिसादाबाबतही समन्वयकांनी आभार मानले आहेत. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बंदची हाक दिली होती.
3 / 13
तसंच कार्यकर्त्यांना शांततेने आंदोलन करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. परंतु मुंबई बंद यशस्वी करून दाखवण्यासाठी आंदोलकांनी दगड उचलल्याचं आणि रेल्वे अडवल्याचं पाहायला मिळालं होतं.
4 / 13
सरकारनं हातात दगड आणि लाठ्या दिल्या आहेत. अन्यायाविरुद्द मराठा समाज एकत्र आला. काही लोकांना त्रास झाला असेल त्यांची आम्ही क्षमा मागतो, असं सकल मराठा समाजाचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले आहेत.
5 / 13
दोन वर्षांपासून सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. औरंगाबादेत आमच्या बांधवानं आत्मदहन केल्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.
6 / 13
मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्याची सल्लामसलत करून आम्ही बंदचा निर्णय घेतला होता. मुंबई बंद करायची असल्यास राजकीय पाठबळ लागत असल्याची भावना होती.
7 / 13
परंतु राजकीय पाठिंब्याशिवाय आम्ही बंद यशस्वी करून दाखवला आहे. राजकीय हेतूने बंद पेटवल्याचा संशयही वीरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.
8 / 13
सकल मराठा समाजानं सुरू असलेला बंद स्थगित केला आहे. मोर्चेक-यांकडून शांतता राखण्याचं आवाहनही सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी केलं आहे.
9 / 13
बंद शांततेच्या मार्गाने सुरू असतानाच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे या बंदला गालबोल लावणाऱ्या घटना घडल्या. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
10 / 13
मुंबई, ठाण्यात तर आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ, तोडफोड करून नुकसान केले. मुंबईतील मानखुर्दमध्येही आंदोलकांनी बेस्ट बसवर दगडफेक करत पेटवून दिली.
11 / 13
सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग विझवली.
12 / 13
मुंबईतील बंदचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. साताऱ्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
13 / 13
तर नवी मुंबईतील कळंबोली येथे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.
टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMumbai Bandhमुंबई बंदMaharashtraमहाराष्ट्र