The names of these NCP leaders are being discussed for the post of opposition leader
विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या या नेत्यांची नावे चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 10:32 PM1 / 5नुकत्याच आटोपलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रावादी काँग्रेसने चांगले यश मिळवले. काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्याने विरोधीपक्ष नेतेपदासाठी राष्ट्रवादीचा दावा पक्का झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची नावे समोर येत आहेत. 2 / 5माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव विरोधीपक्षनेतेपदासाठी चर्चेत आहे. अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यास एक आक्रमक विरोधीपक्षनेता विधिमंडळात दिसू शकतो. 3 / 5राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नावही विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहे. 4 / 5पंकजा मुंडे यांचा पराभव करत भाजपाला जबरदस्त धक्का देणारे धनंजय मुंडे यांचे नावसुद्धा विरोधीपक्षनेतेपदासाठी आघाडीवर आहे. 5 / 5राष्ट्रवादीचे आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड यांचे नावही विरोधीपक्षनेतेपदासाठी चर्चेत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications