Narendra Modi: Chagan Bhujbal's retaliation against Modi by increasing the rate by Rs 25
Narendra Modi: २५ रुपयांची वाढ करुन २ रुपयांची दर कपात, भुजबळांचा मोदींवर पलटवार By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 5:42 PM1 / 8पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत, असा आरोप केला. 2 / 8मात्र, महाराष्ट्रासारख्या, देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत जी सापत्न वागणूक दिली जात आहे, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 3 / 8नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आता, या वादावरुन महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजप नेते असा वाद रंगला आहे. 4 / 8विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. तसेच, राज्य सरकारने सर्वसामान्य मराठी माणसाला दिलासा द्यावा, असेही त्यांनी म्हटलंय. तर, छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिलीय. 5 / 8केंद्र सरकार वारंवार इंधनाचे दर वाढवत असून राज्यांना जीएसटीचा परतावा देत नाही, अशी टिका मंत्री छगन भुजबळ यांनी कली. पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारचे कान टोचल्यानंतर मंत्र्यांनी केंद्रावर पलटवार केला आहे6 / 8२५ रुपयांची वाढ करुन त्यानंतर दोन रुपयांची दर कपात करुन फार मोठी कपात केल्याचा आभास केंद्रसरकारकडून निर्माण केला जातोय अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. 7 / 8पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन छगन भुजबळ यांनी केंद्रसरकारवर निशाणा साधला. किरीट सोमय्या यांच्यावर जो हल्ला झाला त्याबाबतही पत्रकारांनी प्रश्न विचारला असता छगन भुजबळ यांनी रक्तस्त्राव झालेला नाही असे मेडिकल रिपोर्टमध्ये म्हटल्याचे सांगितलं. 8 / 8दोषारोपाचा खेळ हा बचाव करण्यासाठी आणि गैरकृत्ये लपवण्यासाठी चांगला आहे. पण, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत नाही, अशी टिका फडणवीस यांनी सरकारवर केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications