शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

#NationalGirlChildDay : बघा वडिलांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या मराठमोळ्या कन्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 6:13 PM

1 / 5
यात पहिले नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांचे आहे. सुप्रिया यांचे वाढते राजकीय वजन लक्षात घेता त्यांना पवार यांच्या वारसदार मानले जात आहे. 
2 / 5
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर कन्या पंकजा त्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. त्यांच्या दुसऱ्या कन्या खासदार प्रीतम मुंडे याही दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. 
3 / 5
देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे तिसऱ्यांदा सोलापूरमधून निवडून आल्या आहेत. त्यांच्यामध्ये कार्यकर्ते शिंदे यांचीच छबी आढळून येत असल्याचे सांगतात
4 / 5
पूनम महाजन या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या असून त्यांचे वक्तृत्वही वडिलांसारखे ओजस्वी असल्याचे बोलले जाते. 
5 / 5
वर्षा गायकवाड या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्या असून त्या काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. 
टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPoonam Mahajanपूनम महाजनPraniti Shindeप्रणिती शिंदेVarsha Gaikwadवर्षा गायकवाडPankaja Mundeपंकजा मुंडे