शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

NCP: पक्षवाढीसाठी राष्ट्रवादीच्या महिला संघटनेचा महत्त्वपूर्ण निर्णय, पवारांकडून शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 9:03 PM

1 / 7
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आज झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संबोधित केले. या बैठकीत महिला संघटना सक्षम करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
2 / 7
देशात सर्वात आधी आपण महिला धोरण आखून स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले. वडिलोपार्जित मालमत्तेत महिलांनाही हक्क मिळवून दिला.
3 / 7
या निर्णयांचे सुरुवातीला स्वागत झाले नाही. काही बदल समाज लगेच स्वीकारत नाही पण बदल करण्यासाठी ठामपणे आपली भूमिका मांडावी लागते.
4 / 7
महिला धोरणाला आज २८ वर्ष पूर्ण झाली आहेत. यात अजून सुधारणा करण्याची गरज आहे का यावर चर्चा करून त्यातून निष्कर्ष निघाला पाहिजे.
5 / 7
आपण ३३ टक्के आरक्षण ५० टक्क्यांवर नेलं. असे आरक्षण संसदेतही असावे अशी चर्चा सुरू झाल्याचंही पवार यांनी सांगितलं. तसेच, यावर आपल्या पक्षाची भूमिका घेणे अपेक्षित आहे. सुरुवातीला विरोध होईल पण आपण चिकाटी सोडायची नाही.
6 / 7
आपल्या भूमिकेत कणखरपणा आणून त्यावर आवाज उठवला पाहिजे. जिथे अन्याय आहे तिथे आवाज उठवा पण लोकशाहीच्या चौकटीत राहून, असे माझे तुम्हाला सांगणे आहे.
7 / 7
राष्ट्रवादी महिला संघटनेने विभागीय अध्यक्ष नेमण्याचा अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. महिला प्रदेशाध्यक्षांना एकाच वेळी सगळीकडे जाता येणार नाही. त्यामुळे राज्यात महिला संघटनेचा ढाचा बदलण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, असे म्हणत महिला संघटनेचे कौतुकही केले.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस