No Mosque Namaz, No Iftar This Month In Ramadan by nawab malik
यंदा 'रमजान' महिन्यात 'नो मस्जीद नमाज, No इफ्तार' By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 6:37 PM1 / 9पुढील काही दिवसांत पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे, त्यासाठी मुस्लीम बांधवांनी लॉकडाऊनचे नियम पाळणे बंधनकारक आहे. 2 / 9देशात व राज्यात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, मुस्लीम बांधवांना रमजान महिन्यातही काटेकोरपणे सरकारी नियमांचे पालन करावेच लागले. 3 / 9रमजान महिना हा मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असतो, यावेळी नमाज पठण करण्यासाठी मुस्लीम दरवर्षी एकत्र येतात. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे ते शक्य नाही.4 / 9राज्यातील अनेक ठिकाणी मशिदीमध्ये मुस्लीम एकत्र येऊ नमाज पठण करत असल्याचे दिसून आले, त्यावर पोलिसांनी कारवाईही केली आहे. 5 / 9 या सर्व प्रकरणाची दखल घेत, अल्पसंख्याक विकास विभागाने रमजान महिन्यासाठी आवाहन केलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. 6 / 9 कोणत्याही परिस्थितीत घराच्या छतावर, मैदानावर, इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नमाज पठण करु नये7 / 9कोणताही धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी8 / 9सर्व मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठण करावे, तरावीह इफ्तार पार्टी आणि धार्मिक कार्य पार पाडावे9 / 9लॉकडाऊन संदर्भात पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत, उपरोक्त सूचनांचे पालन करावे. आणखी वाचा Subscribe to Notifications