By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 13:53 IST
1 / 8देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा २०० च्या पुढे गेला आहे. २ डिसेंबरला देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर अवघ्या २० दिवसांत देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या २०० च्या पुढे गेली आहे.2 / 8दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ अमेरिकेत ओमायक्रॉननं धुमाकूळ घातला आहे. ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. एका आठवड्यात अमेरिकेतील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. गेल्या आठवड्यात दर १० कोरोना रुग्णांपैकी ३ रुग्ण ओमायक्रॉनचे होते. आता हाच आकडा ७ ते ८ वर पोहोचला आहे.3 / 8भारतातही ओमायक्रॉन वेगानं पसरतो आहे. त्यामुळे तिसरी लाट रोखणं अशक्य असल्याचा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र चिंता करण्यासारखी स्थिती नसल्याचा दिलासादेखील तज्ज्ञ देत आहेत. कोरोनाची R0 व्हॅल्यू तज्ज्ञांसाठी काळजी वाढवू शकते.4 / 8कोरोनाच्या संक्रमणाचं प्रमाण किती ते R0 व्हॅल्यूवरून समजतं. ही एक गणिती संज्ञा आहे. एखाद्या व्यक्तीला विषाणूची लागण झाली की त्याच्या माध्यमातून किती व्यक्तींपर्यंत विषाणू पसरवू शकतो, ते RO व्हॅल्यूवरून समजतं. R0 व्हॅल्यू १ च्या खाली असल्यास त्याचा अर्थ संक्रमण कमी होत आहे असा होतो.5 / 8R0 व्हॅल्यू १ च्या खाली आल्यास विषाणूचा प्रादुर्भाव कमी होतो आणि हळूहळू महामारीचा अंत होतो. महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये R0 व्हॅल्यू वाढली आहे. R0 व्हॅल्यू १ होण्याचा अर्थ एक रुग्ण एका व्यक्तीला संक्रमित करू शकतो. 6 / 8देशातील सध्याची सरासरी R0 व्हॅल्यू ०.८९ आहे. पण महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा, तमिळनाडू, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपूर आणि नागालँडमध्ये R0 व्हॅल्यू ०.८९ पेक्षा अधिक आहे.7 / 8२ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात महाराष्ट्रात R0 व्हॅल्यू ०.७ होती. ती हळूहळू वाढून १४ नोव्हेंबरला ०.८२ वर पोहोचली. २२ नोव्हेंबरला ती ०.९६ वर गेली. 8 / 8२९ नोव्हेंबर आणि ६ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात R0 व्हॅल्यूमध्ये घट झाली. व्हॅल्यू अनक्रमे ०.९२ आणि ०.८५ वर आली. त्यानंतर त्यात वाढ झाली. गेल्या दोन आठवड्यांत व्हॅल्यू वाढली आहे. १९ डिसेंबरला R0 व्हॅल्यू १.०८ वर पोहोचली.