One click on 'Chief Minister' Uddhav Thackeray's oath-taking ceremony
'मुख्यमंत्री' उद्धव ठाकरेंचा जंगी शपथविधी सोहळा एका क्लिकवर By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 9:06 PM1 / 14काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी सोनिया गांधींचं नाव घेऊन त्यांनी आपल्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात केली2 / 14छगन भुजबळ यांच्या रूपाने 5 वर्षानंतर पुन्हा भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभारदेखील त्यांनाच दिला जाण्याची शक्यता आहे.3 / 14 शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची शपथ लक्षवेधी ठरली. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले, तसेच आपले गुरु आनंद दिघे यांचे त्यांनी आवर्जुन स्मरण केले. 4 / 14काँग्रेस नेते नितीन राऊत यांना काँग्रेसकडून पहिल्याच यादीत मंत्रीपद देण्यात आलंय, त्यामुळे विदर्भाला बहुमान मिळालाय5 / 14राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या आईचे नाव घेत आणि शरद पवारांना नमन करत शपथविधीला सुरुवात केली6 / 14ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनीही पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. 7 / 14महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करून दाखवलंच.8 / 14ज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याआधी त्यांनी शिवाजी पार्कातीलच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आपल्या वडिलांना वंदन केलं.9 / 14राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुराही उद्धव यांनी स्वतःच्या खांद्यावर घेत शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात नवा अध्याय रचला आहे.10 / 14उद्धव ठाकरेंच्या या शपथविधी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी होती, देशभरातून दिग्गजांनी आणि राजकीय नेत्यांनी याची देही याची डोळा हा सोहळा पाहिला11 / 14ज्या शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोप रुजवलं आणि वाढवलं, त्याच शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 12 / 14 'छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई-वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली.13 / 14शपथविधी सोहळा पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कसमोरील शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर नतमस्तक होऊन आभार मानले14 / 14शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब सिद्धीविनायक मंदिरात जाऊन देवा श्रीगणेशाचे दर्शन घेतले. आणखी वाचा Subscribe to Notifications