...only compensation is available; How is the process of pick insurance for farmer?
... तरच मिळते नुकसानभरपाई; जाणून घ्या पीक वीम्याची प्रक्रिया असते कशी? By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 5:28 PM1 / 9राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वच ठिकाणी शासनाकडून पंचनामे करण्यात येणार आहे. मात्र, पंचनाम्याची ही प्रक्रिया असते कशी हे या लेखातून जाणून घेऊया. 2 / 9 नुकसानीची तीव्रता पाहून सरकारकडून कृषी विभाग आणि महसूल विभागाला पीक पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले जातात.3 / 9पेरणीनंतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास मदतीसाठी आवश्यक असते पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवणे, पिकनिहाय विमा कंपनीकडून मदतीची रक्कम ही ठरवून दिली जाते.4 / 9 नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास सर्वप्रथम गावचा कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवकास याची माहिती देणे गरजेचे असते. त्यानंतर संबंधित दोन्ही विभागाचे अधिकारी बांधावर येऊन पिकांची पाहणी करतात. 5 / 9नुकसानग्रस्त भागाची पाहणी होत असताना शेतकऱ्यांजवळ सातबारा उतारा, आधार कार्ड, विमा भरलेली पावती आणि क्रमांक, रेशनकार्डची झेरॉक्स, बॅंक पासबुकची झेरॉक्स, असणे गरजेचे आहे.6 / 9पेरणी क्षेत्रापैकी किती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, त्याची तीव्रता काय आहे? या संबंधिचा अहवाल हा कृषी कार्यालय आणि महसूल विभागाला दिला जातो.7 / 9महसूल विभागाकडून नुकसानीचा अहवाल हा विमा कंपनीकडे पाठवला जातो. शासकीय अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनीधी हे मदतीची रुपरेषा ठरवतात.8 / 9पेरणी क्षेत्रापैकी २५ टक्के पेक्षा अधिकच्या क्षेत्रावरील नुकसान झाले असल्यासच ही भरपाई मिळते.9 / 9 नुकसानीच्या अहवालाची पाहणी केल्यानंतरच शेतकऱ्यांनी दिलेल्या बॅंक पासबूकच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा केली जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications