शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...तर उद्धव ठाकरेंना जबर झटका! 'ऑपरेशन टायगर' ही एकनाथ शिंदेंची नवी खेळी कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:35 IST

1 / 10
महाराष्ट्रात नवं सरकार आल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या निवडणुकीपूर्वी ऑपरेशन टायगर चर्चेत आलं आहे. एकनाथ शिंदे गटाकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला टार्गेट करण्यात येत आहे. या मोहिमेची सुरुवात झाल्याचं चित्र दिसून येत आहे.
2 / 10
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, भिवंडी, मीरा भाईंदर, कल्याण यासह प्रमुख शहरातील अनेक नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंना अनपेक्षित यश मिळालं. शिंदेंच्या नेतृत्वात पक्षाचे ५७ आमदार निवडून आलेत.
3 / 10
विधानसभा आणि लोकसभेत भाजपासोबत युतीत लढलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने महापालिका निवडणुकीत स्वबळाची तयारी केली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरील आव्हान मोठे आहे. राज्यात २७ महापालिका, २४३ नगरपालिका, ३७ नगर पंचायत, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.
4 / 10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयासाठी ठाकरेंकडील नेते, कार्यकर्ते आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न शिंदेंकडून सुरू आहेत. जर शिंदेसेनेने मुंबई, ठाणेसारख्या महापालिकेत भाजपासोबत मिळून सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले तर उद्धव ठाकरेंच्या वर्चस्वाला जबरदस्त झटका बसण्याची शक्यता आहे.
5 / 10
मुंबई महापालिकेवर १९८५ सालापासून ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे. जर मुंबई महापालिकेत शिंदेसेना मजबूत झाली तर भाजपासोबत मिळून ते ठाकरेंना सत्तेबाहेर काढू शकतात. त्यामुळे ऑपरेशन टायगर शिंदेंच्या शिवसेनेकडून राबवलं जात आहे. त्यात ठाकरेंकडील खासदार, आमदार अन् स्थानिक शिलेदार मोठ्या संख्येने शिवसेनेत घेण्याची मोहिम हाती घेतली आहे.
6 / 10
२४ फेब्रुवारीपासून एकनाथ शिंदे राज्यात आभार दौरा सुरू करणार आहे. हा दौरा ऑपरेशन टायगरचा एक भाग आहे. यात शिंदेंच्या नेतृत्वाखाली अनेक बडे नेते शिवसेनेत सहभागी होतील. उद्धव ठाकरेंकडील आमदार, खासदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा शिंदेसेनेचे मंत्री करत आहेत.
7 / 10
२७ जानेवारीला मुंबई, नाशिक, कोल्हापूर, जळगाव येथील अनेक ठाकरेंकडील नेते, कार्यकर्ते शिंदेसेनेत सहभागी झाले. १९ वर्ष जिल्हाप्रमुख राहिलेले आसाराम बोराडे, राजूल पटेल यासारखे अनेक नेते शिंदेसेनेत दाखल झालेत. एकनाथ शिंदे सत्तेत असल्याने पक्ष मजबूत करणं त्यांना आणखी सोपे जात आहे.
8 / 10
एकनाथ शिंदे यांनी केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागावरही पक्ष वाढीचं काम हाती घेतले आहे. शाहपूर, भिवंडी, कल्याण येथील सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांनीही शिंदेसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. मीरा भाईंदरमधील माजी उपमहापौर प्रवीण पाटील यांनी समर्थकांसह ठाकरे गटाला रामराम केला आहे.
9 / 10
पक्ष बदलणारे बहुतांश सत्तेचे भुकेले आहेत. त्यांनी विरोधात राहून लोकांच्या प्रश्नावर भांडण्यापेक्षा सत्तेत राहणे पसंत केले. काही कट्टर समर्थक सोडून गेल्याने काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. शिंदेसेनेच्या अभियानानंतर २४ जानेवारीला ठाकरेंनी सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती.
10 / 10
या बैठकीत ज्यांना कुणाला पक्ष सोडायचा असेल तर त्यांनी खुशाल जावे. मला प्रामाणिक लोकांसोबत माझा पक्ष चालवायचा आहे असं उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र तरीही जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव झाला तर ते शिंदेंनी सुरू केलेले ऑपरेशन टायगर हे कधी विसरू शकणार नाहीत.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र