Order for purchase of 10 lakh Remedicivir injection capsules, vijay wadettivar
'10 लाख रेमडीसीवीर अन् प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीचे आदेश' By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 5:58 PM1 / 10कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जे-जे लागेल ते सरकार करीत आहे. 2 / 10रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा देताना प्रतिबंधात्मक साहित्यांअभावी व्यत्यय येऊ नये आणि त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य तात्काळ खरेदी करण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.3 / 10कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत. 4 / 10स्वतःची कुटुंबाची पर्वा न करता सेवा देत आहेत. ही सेवा देताना त्यांच्याकडे पुरेसे प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध असावे यासाठी मंत्री वडेट्टीवार यांनी आदेश दिले आहेत. 5 / 10त्यानुसार, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून १३२ ऑक्सिजन प्लांट (Pressure Swing Adsorption), ४० हजार ७०१ ऑक्सीजन सांद्रित्र (Oxygen concentrator), २७ ISO TANKS, २५ हजार मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, १० लाख रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कुपी खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत6 / 10कोरोना विषाणू हे जागतिक संकट आहे. या संकटातूनही आपण बाहेर पडू, या संकटाचा मुकाबला आपण सर्वांनी मिळून एकजुटीने करुया. 7 / 10परंतु या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी कमी करणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. 8 / 10या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन वेळीच पावले उचलून विविध आदेशांची अंमलबजावणी करत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.9 / 10वडेट्टीवार म्हणाले, प्रशासनाच्यावतीने योग्य त्या उपाययोजना गतीने करण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासन तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनीही काटेकोर पालन करणे आवश्यक आहे10 / 10या आजारावर वेळीच उपचार झाले आणि रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केले तर हा आजार निश्चित बरा होतो. म्हणून कोणीही या आजाराबाबत चुकीच्या अफवा पसरवू नयेत, असेही त्यांनी सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications