Organized Goodwill Rally for the message of social unity
सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी सांगलीत सद्भावना रॅलीचं आयोजन By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 8:27 PM1 / 5मकरसंक्रांतीचे औचित्य साधून सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सांगलीत सद्भावना रॅलीचं रविवारी आयोजन करण्यात आलं. 2 / 5जिल्हा प्रशासनातर्फे कर्मवीर चौकातून सकाळी नऊ वाजता रॅलीस प्रारंभ झाला. 3 / 5रॅलीत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील उपस्थित होते. 4 / 5जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शशिकांत बोराटे यांच्यासह सांगली, मिरजेतील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. 5 / 5शहरातील विविध मार्गावरून फिरून रॅली छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गेली. तिथे एकतेची शपथ दिल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications