शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Photo's : 'छत्रपतींचे तख्त मराठी, मराठ्यांचे रक्त मराठी'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 3:09 PM

1 / 10
विधानभवनातील मराठी भाषा दिन कार्यक्रमात मराठी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. तसेच विधान भवनाच्या आवारात स्टॉल लावण्यात आले होते.
2 / 10
ज्या संस्कारातून स्वराज्य उभारलं तीच भाषा मराठी आहे, छत्रपती शिवरायांवर संस्कार घडविणाऱ्या जिजाऊंची भाषा मराठी आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले
3 / 10
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने टाळ, मृदुंग, वीणा आणि पारंपरिक वेशभुषेत मराठी ग्रंथ दिंडीने यात्रा केली
4 / 10
वारकरी संप्रदायाची भूमी असलेल्या मराठी संत ज्ञानेश्वरांपासून ते संत गाडगे बाबांपर्यंत सर्वांनीच मराठीच प्रचार आणि प्रसार केलाय. त्याच वारकरी वेशाष विधानभवनात मराठीजण दिसून आले.
5 / 10
चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी मराठी भाषा दिनी संस्कृत भाषा लिहिलेली डिझाईन असलेली साडी परिधान केली होती, विधानभवन परिसरात ही साडी लक्षणीय आणि चर्चेची ठरली.
6 / 10
चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी मराठी भाषा दिनी संस्कृत भाषा लिहिलेली डिझाईन असलेली साडी परिधान केली होती, विधानभवन परिसरात ही साडी लक्षणीय आणि चर्चेची ठरली.
7 / 10
विधानभवन परिसरात महाराष्ट्रमधील ग्रामीण जीवन दाखवण्यात आले. लोहार, न्हावी कुंभार इत्यादी कसे काम करतात हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कुतूहलाने पाहिले.
8 / 10
राज्यातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी, विद्यार्थ्यांमध्येही मराठी भाषेचा गोडवा दिसून आला.
9 / 10
विधानभवनात 'मराठी भाषा दिन' कार्यक्रमात मराठी भाषेची परंपर, संस्कृती, वारसा आणि जतन यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.
10 / 10
गोंधळी, वारकरी आणि मराठी लोककलेचाही सहभाग विधानभवनातील ग्रंथदिंडी आणि कार्यक्रमात दिसून आला.
टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनUddhav Thackerayउद्धव ठाकरेmarathiमराठी