By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 15:02 IST
1 / 9देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी शपथ घेतली. त्यांच्या रूपाने मराठमोळा माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या 'सर्वोच्च' स्थानी विराजमान झाला आहे.2 / 9न्या. शरद बोबडे हे मूळचे नागपूरचे आहेत आणि लॉकडाऊनच्या काळात ते आपल्या घरीच आहेत. 3 / 9आपल्या घरूनच ते सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी घेत आहेत.4 / 9आज मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना त्यांनी हार्ले डेव्हीडसनची सुपर बाईक पाहिली. 5 / 9बाईकची प्रचंड क्रेझ असल्यानं, या धाकड बाईकवर बसण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.6 / 9बाईकच्या मालकाची परवानगी घेऊन सरन्यायाधीश बाईकवर बसले आणि हे दृश्य टिपण्यासाठी सगळ्यांचेच मोबाईल सरसावले. 7 / 9शरद बोबडे यांना वाचनाचा, फोटोग्राफीचा आणि क्रिकेट खेळण्याचा छंद आहे. त्यासोबतच त्यांची नवी पॅशन आज सगळ्यांना समजली.8 / 9याआधी, जानेवारी महिन्यात नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या एका मैत्रिपूर्ण क्रिकेट सामन्यात सरन्यायाधीशांची बॅटिंग सगळ्यांनी पाहिली होती.9 / 9तंत्रशुद्ध फलंदाजीचं दर्शन घडवत त्यांनी ३० चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १८ धावा केल्या होत्या.