pm narendra modi suggested micro lockdown in conversation with 7 cm including uddhav thackeray
१ ऑक्टोबरपासून राज्यात 'मायक्रो लॉकडाऊन'?; मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला होता सल्ला By कुणाल गवाणकर | Published: September 28, 2020 6:37 PM1 / 10देशातील कोरोना बाधितांच्या संख्येनं ६० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर मृतांचा आकडा १ लाखांच्या आसपास पोहोचला आहे. त्यात केंद्र सरकारच्या अनलॉक-४ चा कालावधी संपत आला आहे. 2 / 10१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत अनलॉक-४ च्या अंतर्गत मेट्रो सेवा सुरू करण्यात आली. याशिवाय इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासही परवानगी दिली. मात्र राज्यातल्या ठाकरे सरकारनं अद्याप मेट्रो, शाळा सुरू केलेल्या नाहीत. 3 / 10मोदी सरकारनं अनलॉक-५ ची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात नियमावली तयार करण्याचं काम सुरू आहे. 4 / 10गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात मुख्यमंत्र्यांशी संवाद झाला. कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या मुख्यमंत्र्यांशी बातचीत करून मोदींनी स्थानिक परिस्थितीची माहिती जाणून घेतली.5 / 10महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मोदींनी 'मायक्रो लॉकडाऊन'वर भर दिला.6 / 10कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागांमध्ये एक-दोन दिवसांचा लोकल लॉकडाऊन केल्यास तो किती फायदेशीर ठरू शकतो, याचा विचार राज्यांनी करायला हवा, असं मोदींनी सुचवलं होतं.7 / 10पंतप्रधान मोदींनी सुचवलेली ही कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राबवणार का, याकडे आता लक्ष लागलं आहे. लवकरच राज्य सरकार मिशन बिगिन अंतर्गत आपली नवी नियमावली जाहीर करणार आहे.8 / 10मोदींनी सुचवलेली मायक्रो लॉकडाऊनची कल्पना ठाकरे सरकार मिशन बिगन अंतर्गत लागू करणार का, याकडे लक्ष लागलं आहे. 9 / 10मोदींनी सुचवलेली मायक्रो लॉकडाऊनची कल्पना ठाकरे सरकार मिशन बिगन अंतर्गत लागू करणार का, याकडे लक्ष लागलं आहे. 10 / 10राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १३ लाखांच्या पुढे आहे. देशात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त निर्बंध लागू आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications