Politics bjp and shiv sena leaders statements
भाजपा-सेना नेत्यांच्या 'या' डरकाळ्या, गर्जना वाचून खो-खो हसाल! By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 1:21 PM1 / 13आजवर आमची मैत्री पाहिली, मात्र वाघाचा पंजा नाही पाहिला - उद्धव ठाकरे 2 / 13वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजती दात, आमची जात.. आम्हाला पंजा दाखवू नका - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस3 / 13यापुढे युती करणार नाही. शिवसेनेच्या ५० वर्षांच्या इतिहासामध्ये या युतीमुळे २५ वर्षे वाया गेली. आता युतीसाठी कोणाचा दरवाजा ठोठावणार नाही - उद्धव ठाकरे4 / 13आता मैत्रीपूर्ण सामने बंद. युतीचे राजकारण बास्स झाले - उद्धव ठाकरे 5 / 13आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत - दिवाकर रावते 6 / 13सावजाची शिकार मीच करेन. त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही. पण, आता सावजच दमलंय, त्याला मारण्यासाठी बंदुकीचीही गरज नाही - उद्धव ठाकरे7 / 13स्वबळावर लढणे हा गुन्हा नाही. आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्हालाच लढावे लागेल - उद्धव ठाकरे8 / 13शिवसेनेचे प्रेम छुपे आहे, तर आमचे उघड आहे. कुणी कितीही नाकारले, तरी भाजपा आणि शिवसेनेची युती होणारच - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री9 / 13या सरकारने जनतेला फसविल्याने भाजपाशी युती नाही. स्वतंत्रपणे निवडणूक लढून संपूर्ण महाराष्ट्र भगवा करणार - उद्धव ठाकरे10 / 13यापुढे शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. भाजपाचे नेते काहीही म्हणू द्या, शिवसेनेसाठी युतीचा अध्याय संपला आहे - उद्धव ठाकरे11 / 13आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहावे. युती होईल की नाही, या द्विधा मनस्थितीत राहू नये. युती झाली तर ठीक; नाहीतर शिवसेनेला आपटून टाकू (पटक देंगे) - अमित शहा, भाजपाध्यक्ष12 / 13खानाच्या फौजांचा पद्धतशीर सामना करू - उद्धव ठाकरे13 / 13शिवसेना पोकळ धमक्या आणि पादऱ्या पावट्याच्या इशाऱ्याला घाबरत नाही - संजय राऊत आणखी वाचा Subscribe to Notifications