ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 16 - जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ७ टक्के मतदान झाले. शेतकरी व कष्टक-यांनी सकाळी मतदान करीत शेतात जाणे पसंत केले. तर जळगाव तालुक्यातील नशिराबाद व आव्हाणे येथे मतदार याद्यांमध्ये घोळ आढळून आल्याने नागरिकांनी दोन केंद्रांवरील मतदान बंद पाडले आहे. जिल्हाधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. शेतकरी व कष्टक-यांची गर्दीजळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे ६७ गट व पंचायत समितीचे १३४ गणांसाठी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. गट व गणामधील उमेदवारांनी सकाळीच मतदान करीत आपले कर्तव्य बजावले. सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून शेतीची कामे सुरु आहेत. त्यामुळे सकाळी ८ वाजेपासून मतदान केंद्रांवर गर्दी सुरु झाली. शेतकरी व शेतमजुरांनी सकाळीच मतदान आटोपले. दोन केंद्रावर मतदान थांबवलेनिवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याने अनेक उमेदवारांची नावे मिळून आली नाही. त्यामुळे काही मतदारांना केंद्रावरून मतदान न करता परत जावे लागले. यामुळे उमेदवार व मतदारांनी जळगाव तालुक्यातील नशिराबाद व आव्हाणे येथील दोन केंद्र बंद पाडले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी नशिराबाद येथील केंद्रावर भेट दिली आहे. सरासरी ७ टक्के मतदान सकाळी ९ वाजेपर्यंत जळगाव जिल्ह्यात सरासरी ७ टक्के मतदान झाले होते. त्यात यावल ६.२८ टक्के, रावेर ७.६८, मुक्ताईनगर ६.५, बोदवड ६.५८, भुसावळ ४.८०, जळगाव तालुक्यात ७. ४५ चोपडा 9.24, जामनेर 7.65, पारोळा 6.85, अमळनेर ७.२९, पाचोरा ७.७५, एरंडोल ७.२६, भडगाव ६.९६, चाळीसगाव ६.६५, धरणगाव 9.68 टक्के मतदान झाले होते. बीएसएफ जवानासह नवरदेवांनी बजावला मतदानाचा हक्कसध्या लग्नतिथी मोठी आहे. त्यातच जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान असल्याने अनेक नवरदेव व नवरींनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात मणिपूर येथील बीएसएफ जवान गोरखनाथ दिलीप जाधव (सायगाव, ता.चाळीसगाव) या नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. शिरसोली चिंचोळी गट मतदान केंद्राजवळ नायब तहसीलदार दीलिप रामदास बारी आणि पोलीस अधिकारी यांच्यात वाद. यावल जि.जळगाव मतदान टक्केवारी सकाळी 7.30 ते सकाळी 11.30 वाजेपर्यंत किनगाव – डांभुर्णी गट : 20.25 टक्केहिंगोणे – सावखेडासिम गट : 13.77 टक्केन्हावी – बामणोद गट : 12.15 टक्केसाकळी – दहिगाव गट : 22.09 टक्केभालोद – पाडळसे गट : 8.06 टक्केयावल तालुका सरासरी : 15.21 टक्के जळगाव : जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीसाठी कोथळी येथे मतदानाचा हक्क बजावताना माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे, मंदाताई खडसे आणि जे.डी.सी.सी बँक चेअरमन रोहिणीताई खडसे-खेवलकर लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्कजळगाव, लग्न मांडवात जाण्यापूर्वी या रवींद्र बारी आणि उज्ज्वला बारी या नवविवाहीत दाम्पत्याने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.https://www.dailymotion.com/video/x844r8d