ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 14 - महानिर्मितीच्या कोराडी येथील तीन संचाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी पारडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात वीज संचाचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कोराडी वीज प्रकल्पाची पाहणी करीत महानिर्मितीच्या कार्याचे कौतुक केले. कोराडी येथील वीज प्रकल्पात यानिमित्त आयोजित समारंभाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कायदे आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.(डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरचे खास हॅशटॅग)कोराडी येथील तीन संच १४ हजार ८०० कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आले आहे. यामध्ये १७० मीटर उंचीचे तीन कुलिंग टॉवर असून चिमणीची उंची २७५ मीटर आहे. प्रकल्पाला ९.१ मिलियन मेट्रिक टन कोळसा आणि ६४ दलघमी पाणी प्रत्येक युनिटला लागणार आहे. यातीलन ४९.५ दलघमी पाणी नागपूर महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करून घेण्याच्या उपक्रमाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. (पंतप्रधान मोदींनी वाहिली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली)चंद्रपुरातील दोन वीज संचावर ७००४ कोटी खर्च करण्यात आले असून १६७ हेक्टर जागेत ते उभारण्यात आले आहे. परळीतील संचावर २०८१ कोटी रुपये खर्च करण्यात येऊन तो १३० हेक्टर जागेमध्ये आहे. कोराडी येथील तिन्ही संच हे जपानच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित राज्यातील पहिले विद्युत संच आहे, हे विशेष! त्यामुळे उत्पादन खर्चात आणि त्यासोबतच प्रदूषणातही घट होणार आहे.PM Narendra Modi visits new units in Koradi thermal Power Station in Nagpur, Maharashtra pic.twitter.com/95EMqcjy6B— ANI (@ANI_news) April 14, 2017PM Narendra Modi inaugurates new units in Koradi thermal Power Station in Nagpur, Maharashtra pic.twitter.com/4XGl0GV3sR— ANI (@ANI_news) April 14, 2017 (पंतप्रधान मोदींचे दीक्षाभूमीवर महामानवाला अभिवादन)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी येथे भेट देऊ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले आहे. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केलं. शिवाय, तेथील गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेलाही अभिवादन केले.