rahul shewale says if mumbai not get vaccine even after global tender it will be centre failure
Corona Vaccine: “ग्लोबल टेंडर काढूनही मुंबईला लस मिळाली नाही, तर ते अपयश केंद्राचे असेल” By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 7:01 PM1 / 15देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. 2 / 15कोरोनाचा मृत्यूदरही वाढत चालला आहे. देशातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. यातच कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. 3 / 15लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम होताना दिसत आहे. यातच आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी जागतिक निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. 4 / 15महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि तेलंगण यांसह काही राज्यांनी कोरोना लसींसाठी जागतिक निविदा काढण्याचा पर्याय स्वीकारला आहे. कोरोना लसींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 5 / 15महानगरपालिकेने मुंबई शहरासाठी एक कोटी कोरोना लसींची जागतिक निविदा काढली आहे. आता त्यावरुनही राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे. लसींसाठी जागतिक निविदा काढल्यानंतरही मुंबईला लस पुरवठा होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय.6 / 15जागतिक निविदा काढूनही मुंबईला लस मिळाली नाही तर ते अपयश केंद्राचे असेल, असे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. 7 / 15मुंबई महापालिकेच्या जागतिक निविदासाठी जगभरातील अनेक कंपन्या उत्सुक असून त्या योग्य असा प्रतिसाद देतील. केंद्र सरकारच्या परवानगी अभावी त्यांची अडवणूक होईल, असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे. 8 / 15त्यामुळे मुंबई महापालिकेच्या जागतिक निविदांचा उद्देश साध्य व्हायचा असेल, तर त्याला केंद्राच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असंही ते म्हणाले. 9 / 15महापालिकेने लसीसाठी जागतिक निविदा काढण्याचे काम केले. ज्यावेळी त्याला कंपन्या प्रतिसाद देतील तेव्हा त्यांना परवानगी देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. 10 / 15कोरोना लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणारी मुंबई महापालिका पहिली आहे. १८ मे ही टेंडर भरण्याची शेवटची तारीख असेल. 11 / 15वर्क ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर कंपन्यांना ३ आठवड्यात लसींचा साठा द्यावा लागेल. तसेच त्यांना ICMR आणि DGCI च्या नियमावलीचे पालनही करावे लागेल. 12 / 15गरज भासल्यास त्यांना कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करावी लागेल. कोरोना लसींची परिणामकारकता टेंडरच्या नियम व अटीनुसार ६० टक्क्यांपेक्षा कमी असता कामा नये. 13 / 15तसेच आम्ही त्यांना कोणतेही आगाऊ पेमेंट करणार नाही. कंपन्या वेळेत लस देऊ शकल्या नाहीत तर आम्ही त्यांना दंड करू, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.14 / 15देशात फायझर, मॉडर्ना आणि इतर लसींना अजून परवानगी नाही. स्पुटनिक या रशियाच्या लसीचा साठा भारतात यापूर्वीच डॉ. रेड्डी फार्मा यांच्याकडे आला. मात्र, त्यांना डोमेस्टिक सप्लायचे लायसन्स नाही.15 / 15देशात फायझर, मॉडर्ना आणि इतर लसींना अजून परवानगी नाही. स्पुटनिक या रशियाच्या लसीचा साठा भारतात यापूर्वीच डॉ. रेड्डी फार्मा यांच्याकडे आला. मात्र, त्यांना डोमेस्टिक सप्लायचे लायसन्स नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications