रायगड महोत्सवामुळे रायगडावरील पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.छत्रपतींच्या काळातील पारंपरिक टाळनृत्य दांडपट्टा कसरतीचे मर्दानी खेळ ढोल-ताशे यांनी उपस्थितांना शिवकाळाची झलक दाखविली.राजसदर येथे मुख्यमंत्र्यांसमोर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे भव्य व अत्यंत देखणे नाट्य सादर करण्यात आले.राणीवसा पालखी दरवाजा होळीचा माळ बाजारपेठ जगदीश्वराचे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी नगारखाना राजसदरेवरील मेघडंबरी या स्थळांना भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शिवकालीन इतिहासाचा अनुभव घेतला.जागतिक नकाशावर रायगड झळकावा हा या महोत्सवामागचा उद्देश आहे. महोत्सवातून पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.विख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गडावर शिवसृष्टी साकारली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरूवारी रायगड महोत्सवाचे उद्घाटन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पुनर्विकासासाठी गडाला शिवकालीन वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.