जयंत धुळप / ऑनलाइन लोकमतरायगड, दि. 18 - लोकमत रायगड कार्यालयाने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे थेट पाठपूरावा केल्यावर, लोकमतची विनंती मान्य करुन रायगड मधील विद्यार्थी आणि विज्ञान जिज्ञासू करिता मंगळवारी एक दिवस सायन्स एक्स्प्रेस रोहा रेल्वे स्थानकात थांबविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतल्यावर मंगळवारी प्रत्यंक्ष सायन्स एक्स्प्रेस रोहा रेल्वे स्थानकात जावून पाहण्याकरीता आणि वैज्ञानिक ज्ञान संपादन करण्याकरिता रायगड िजल्ह्यातील विद्यार्थी आणि विज्ञान जिज्ञासूंनी कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता रोहा रेल्वे स्टेशन गाठले. तर अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी लोकमत कार्यालयात फोन करुन धन्यवाद दिले.विज्ञान प्रसाराकरीता केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि विज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स एक्स्प्रेस हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 16 डब्यांची ही विशेष विज्ञान ट्रेन कोकणात केवळ रत्नागीरी व मुंबई थांबणार होती. परिणामी रायगड मधील विद्यार्थी आणि विज्ञान जिज्ञासूं या सायन्स एक्स्प्रेसच्या बौद्धीक लाभास वंचित राहाणार होते. ही बाब लोकमत रायगड कार्यालयाने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ईमेल करुन लक्षात आणून देवून, ही ट्रेन रायगड मध्ये एक दिवस थांबवीण्याची विनंती केली होती. लोकमतची ही विनंती माऩ्य करुन मंगळवार दि.18 जुलै 2017 रोजी सायन्स एक्स्प्रेस रायगडवासीयांकरिता रोहा स्थानकात थांबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री प्रभू यांचे कार्यालयीन सचिव सुधीर भालेराव यांनी लोकमतला फोन करुन दिली. तर रेल्वे मंत्रालयाकडून या बाबत ईमेल करुन ही कळवीण्यात आले.आणखी वाचा -आधी स्वत:कडे पहा, सुषमा स्वराजांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा केला उघड सीमा ओलांडल्या पण व्हिसा मिळेना, पाकिस्तानातील वधूची सुषमा स्वराजांकडे धाव"मंगळावर असलात तरी आम्ही परत आणू", सुषमा स्वराजांचं मिश्कील उत्तरमुलाच्या उपचारासाठी सुषमा स्वराजांनी पाकिस्तानी नागरिकाला मिळवून दिला व्हिसापूर्व नियोजित कार्यक्रमानुसार ही सायन्स एक्सप्रेस रत्नागिरी येथे 14 ते 17 जुलै 2017 या कालावधीत थांबून थेट मुंबईस जावून 19 ते 22 जुलै रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे थांबणार होती. मात्र लोकमतच्या विनंती नुसार पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करुन रोहा रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायन्स एक्स्प्रेस थांबल्याने रायगडच्या विद्यार्थ्यांना या सायन्स एक्झिबीशनचा लाभ घेता आला आहे.सायन्स एक्स्प्रेस रोहा येथे मंगळावारी थांबविण्याची विनंती मान्य झाल्यावर, लोकमतने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन नार्वेकर आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांच्याशी संपर्क साधून, सायन्स एक्स्प्रेस मंगळवारी रोहा येथे थांबणार असल्या बाबत जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना, शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या बाबत परिपत्रक काढून माहिती द्यावी अशी विनंती केली होती.ती देखील या उभय अधिकाऱ्यांनी तत्काळ मान्य करुन जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना माहिती देण्यात आली. परिणामी जिल्हातील विविध शाळातील 50 हजारा पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दुपारी एक वाजे पर्यंत लाभ घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.