ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २७ - उन्हाच्या रणरणत्या तडाख्यातून दिलासा देण्यासाठी मान्सूनचे आगमन झाले असून वातावरणातील गारव्यामुळे सर्वजण सुखावले आहेत. अशा या चिंब पावसात भिजण्यासाठी लहानथोर सर्वजण नेहमीच तयार असतात. पावसाळी वातावरणात मित्र-मैत्रिणी वा कुटुंबियासह ट्रेक व पिकनिकला जाऊन पावसाळ्याचा आनंद लुटणं कोणाला नाही आवडणार? मुंबईतील अशाच काही ठिकाणांची माहिती तुमच्यासाठी... 1) कोंडेश्वर धबधबा- बदलापूरमध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकापासून पूर्वेला साधारण १५ किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा अतिशय लोकप्रिय पिकनिक पॉईंट आहे. तिथे शंकर व गणपतीचे मंदिरही असून शंकराच्या मंदिरामुळचे त्या धबधब्याला कोंडेश्वर हे नाव पडल आहे. पंधरा फुटांवरून अधिक उंचीवरून कोसळणा-या या धबधब्याखाली भिजण्याची मजा लुटण्यासाठी फक्त स्थानिकच नव्हे तर मुंबई व बाहेरूनही अनेक पर्यटक येत असतात.कसे जाल : तेथे जाण्यासाठी तुमची स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच अन्यथा बदलापूरला उतरून टमटमही मिळू शकते. 2) माळशेज घाट- कल्याण-मुरबाड मार्गमुंबईतील ट्रेकर्स व पिकनकिसाठी जाणा-या तरूणांमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेला हा माळशेज घाट पावसाळ्यात हिरवाईने अक्षरश: नटलेला असतो. या घाटातील मनोरम दृश्यं, कड्यांवरून कोसळणारा पाऊस आणि तेथील धबधबे यामुळे पर्यटकांची इथे खूप गर्दी असते. तसेच पावसाळ्यात येथील जलाशयात येणारे फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी जमते. तसेच घाटाच्या पायथ्याशी अनके चांगली रिसोर्ट्स असून उत्तम जेवण मिळते. 3) पळस दरी - मध्य रेल्वेच्या खोपोली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेले हे गाव पावसाळी पिकनिकसाठी एक उत्तम ठिकाण असून पर्यटकांचा आवडता स्पॉट आहे. येथून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे, डोंगरांवर पसरलेली हिरवाईची झालर, जवळच असलेला सोनगिरी किल्ला यामुळे हा स्पॉट पिकनिक व ट्रेकर्ससाठी एकदम चर्चेत असतो. ४) कान्हेरी - बोरीवलीमुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही काही निवांत ठिकाणे असून उपनगरातील आवडता पावसाळी पिकनिक स्पॉट म्हणजे कान्हेरी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी परिसरात अनेक धबधबे असून कॉलेज तरुणांचे सर्वात आवडते ठिकाण आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गेटवरून कान्हेरी गुंफेकडे जाण्यासाठी अनेक बस उबलब्ध आहेत. ५) भिवपुरी धबधबा- भिवपुरीमध्य रेल्वेच्या भिवपुरी स्थानकाहून शेतातून जाणारी पाउलवाट अवघ्या अर्ध्या तासात भिवपुरी धबधब्याकडे नेते. माथेरानच्या पठारावरून येणारं हे पाणी धबधब्याच्या रुपाने खाली येतं आणि त्याचमुळे हा धबधबा सेफ असून वीकेंड्सना येथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसते. स्थानकाजवळ काही हॉटेल्स असून तेथे चांगले जेवळ मिळते. ६) माथेरान -भर पावसात माथेरानला जाऊन भिजण्याची मजा काही औरच. नेरळ स्टेशनला उतरून मिनी ट्रेनद्वारे माथेरानला जाताना खूप मजा येते. तसेच नेरळ ते माथेरान या ट्रेनप्रवासादरम्यान अनेक धबधबेही लागतात. अनेक पर्यटक तेथे उतरून धबधब्यांखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात. ७) तुंगारेश्वर - मुंबई-अहमदाबाद हायवेलगत, वसई.मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर असलेले हे ठिकाण धार्मिकही आहे आणि एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट. वसईजवळील हा प्रसिद्ध धबधबा असून तेथे प्रसिद्ध शिवमंदिरही आहे. तेथे नदी आणि धबधबा अशा दोन्हींचा आनंद घेता येतो. वसई रोड स्थानकावरून एसटीने तुंगारेश्वरला जाता येते. डोंगरावर खाण्यापिण्याची सोय नसली तरी तुंगारेश्वर मंदिराजवळ खाण्या-पिण्याची सर्व सोय उपलब्ध असते. उद्या वाचा अहमदनगरमधील 'कश्मिर'ची माहिती....