शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राज ठाकरेंचं शाळेत भांडण, शिक्षिकाच रडल्या..; बाळासाहेबांचा किस्सा, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 2:05 PM

1 / 10
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आक्रमक नेते आणि वक्ते म्हणून राज्यभर परिचित आहेत. राज ठाकरेंचा दरारा कायम राज्याच्या राजकारणात राहिला आहे. बाळासाहेबांचा पुतण्या म्हणून राज ठाकरे लहानपणापासून त्यांच्या सहवासात वाढले.
2 / 10
आज राज ठाकरेंबाबत अनेकांना आदरयुक्त दहशत वाटते. परंतु याच राज ठाकरेंच्या बालपणीचे अनेक किस्से आज एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीतून उघगडण्यात आले. ABP माझानं राज ठाकरे आणि त्यांच्या आईंची ही मुलाखत घेतली.
3 / 10
या मुलाखतीत राज ठाकरेंनी शाळेतून आलेल्या तक्रारीची आठवण सांगितली. राज ठाकरे म्हणाले की, त्यावेळी छोट्या गोष्टीही मोठ्या वाटायच्या. मी शाळेत गेलो, वर्गात बसलो आणि शिपाई आला, ठाकरे, रांगणेकर तुम्हा दोघांना प्रमुखांनी बोलावले. शाळा सुरू होऊन नुकतेच ५ मिनिटे झाले होते.
4 / 10
आम्ही दोघे शाळेच्या वर्गप्रमुखांकडे गेलो. तिथे आम्हाला सांगितले बाहेर गॅलरीत उभे राहा. १-२-३ तास झाले अक्षरश: शाळा सुटेपर्यंत आम्हाला गॅलरीत उभे केले होते. शाळा सुटल्यानंतर आम्ही उभे होतो. प्रमुख आल्या म्हणाल्या, उद्या पालकांना बोलवा. ही त्यांची चूक झाली.
5 / 10
दुसऱ्यादिवशी तुला शाळेत बोलावलंय असं आईला म्हटलं आणि दिवसभर उभे केले हे सांगितले. त्यानंतर मी शाळेत आलो. वर्ग सुरू झाला तितक्यात शिपाई आला, ठाकरे बोलावलंय. मला वाटलं आज दिवसभर उभं राहावं लागतंय.
6 / 10
तो शिपाई पुढे चालतोय, मी त्याच्यामागे होतो. शाळा सुरू होती त्यामुळे सगळी शांतता. जिन्याखाली उतरलो. ग्राऊंडफ्लोअरला आलो. तिथून दादासाहेब रेगे यांच्या ऑफिसच्या दिशेने जात होतो. बहुदा आता शाळेतून काढून टाकलं जाईल असं मला वाटलं. परंतु मी असं काहीस केले नव्हते.
7 / 10
आतमध्ये पोहचलो. त्या दोन्ही शिक्षिका रडत होत्या. त्यांच्यासमोर बाळासाहेब, माझे वडील बसले होते. दादासाहेब रेगे शिक्षिकांना ओरडत होते. बापूसाहेब रेगे बाजूला उभे होते. मला समोरचे चित्र पाहून काहीच समजेना.
8 / 10
त्यानंतर एक वर्षानंतर असाच एकजण मी त्याला शिवी दिली होती. म्हणून माझे नाव सांगण्यासाठी शिक्षिकेकडे गेला. पुन्हा मला बोलावणे आले. मी उभा होतो. तू याला शिवी दिली असं हा म्हणतोय. तर मी नाही म्हटलं तेव्हा त्याच शिक्षिका होत्या ज्या म्हणाल्या, मला माहिती होते हा शिवी देणार नाही आणि त्या मुलाला गॅलरीत उभे केले. राज ठाकरेंनी सांगितलेली आठवण ऐकून अनेकांना हसू आवरेनासे झाले.
9 / 10
बाळासाहेब शाळेत कसे आले याबाबत राज यांना विचारणा केली असता. त्यादिवशी आई शाळेत येण्यासाठी निघाली तेव्हा काही वेळात बाळासाहेब तिथे आले. त्यांनी विचारलं तेव्हा ती शाळेत गेलेत, राजाने कायतरी केलंय म्हणून शाळेने बोलावले असं म्हटलं.
10 / 10
तेव्हा बाळासाहेबांनी माझ्या वडिलांना कारमध्ये बसवले आणि शाळेत आले. त्यानंतर शाळेतील ते दृश्य पाहून मलाही धक्का बसला होता. दिवसभर राज ठाकरेंना उपाशी ठेवल्यामुळे बाळासाहेबांनी रेगेंना जाब विचारला. तेव्हा रेगेंनी मुलांना उपाशी का ठेवले असा सवाल शिक्षिकांना केला. मी बोलले बरोबर केले. तेव्हा बाळासाहेब बोलले तू गप्प बस, राज यांची बाजू बाळासाहेबांनी घेतली असं राज ठाकरेंच्या आई म्हणाल्या.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे