राज ठाकरेंचा 'पंच'; मोदींवरचे पाच जबरदस्त 'स्ट्राईक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 22:56 IST
1 / 6मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एअर स्ट्राइकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर जोरदार राजकीय स्ट्राईक केला. जाणून घेऊया राज ठाकरे यांनी मोदींना लक्ष्य करून मारलेल्या पाच जबरदस्त पंचविषयी.2 / 6 नरेंद्र मोदी हे फकीर नाहीत, तर बेफिकीर : लवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले याचे कोणतंही दुख: न बाळगता पुढील काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात हसऱ्या चेहऱ्यांनी फिरत होते. 3 / 6 'अजित डोवालांची 'ती' भेट होताच, एक-दीड महिन्यात देशात युद्धसृदश्य स्थिती का?' : देशाचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नेमकं करतो काय, तो कसला सल्ला देतो, असा प्रश्नही विचारत राज यांनी पुलवामा हल्ल्याची जबाबदारी अजित डोवाल यांची नव्हती का, असा प्रश्न उपस्थित केला4 / 6'जवानांनी 'एअर स्ट्राईक' केला, पण जंगलात... दहशतवादी मेलेच नाहीत' : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने एकर स्ट्राइक केला. पण त्यांना चुकीची माहिती दिली गेली. त्यामुळे बाँम्ब जंगलात पडले. त्यामुळे दहशतवादी मेलेच नाहीत, असा दावा राज ठाकरे यांनी केला 5 / 6'जे आपल्याला शिव्या देतील, त्यांना घराबाहेर काढून मारा; भाजपाची नाटकं खूप झाली!' : आपल्याविरोधात सोशल मिडीयामध्ये ट्रोल करणाऱ्यांना घराबाहेर काढून मारा असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला6 / 6दोन देतो का?, तीन देतो का? विचारायला मी काही प्रकाश आंबेडकर नाही!' : कुठल्याही पक्षासोबत आपली चर्चा सुरू नसल्याचा दावा करताना त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला