Ratnagiri, Tiware Dam Breached: होत्याचे नव्हते झाले! तिवरे धरण दुर्घटनेची हृदय हेलावणारी छायाचित्रे By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 1:29 PM
1 / 7 चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर अनेक स्थानिक रहिवासी बेपत्ता झाले असून, काही जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. 2 / 7 मंगळवारी रात्री धरण फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चिखल आणि पाण्याचा लोंढा गावांच्या दिशेने आला. त्याचा तडाखा सुमारे 12 घरांना बसला. 3 / 7 मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्याच्या झोतामुळे आसपासच्या गावातील वस्त्यांचे मोठे नुकसान झाले. 4 / 7 अचानक आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसले. 5 / 7 अचानक आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसले. 6 / 7 धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत अनेक कुटुंबातील व्यक्ती वाहून गेल्याने त्यांच्या नातेवाईकांना आक्रोश आवरता येत नव्हता. 7 / 7 दुर्घटनेतून बचावलेल्या अनेकांना एनडीआरएफ आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळावरून बाहेर काढले. आणखी वाचा