शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राज्याच्या मदतीला धावली 'रयत', कोरोनासाठी 2 कोटी 75 लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 6:44 PM

1 / 10
खासदार शरद पवार यांनी रयतच्या कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले सुपूर्द केला आहे.
2 / 10
साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले होते.
3 / 10
त्यानुसार आज संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जमा केलेल्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
4 / 10
कोरोना या जागतिक महामारीने ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार रयत शिक्षण संस्था सातारा, या संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता.
5 / 10
कोरोना कालावधीत विविध संस्था, संघटना आणि नागरिकांनीही राज्य सरकारला व केंद्र सरकारला सहायता निधी दिला आहे.
6 / 10
या सर्व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय वेतनाची जमा रक्कम रुपये २ कोटी ७५ लाख ९२ हजार ८२१ रुपये इतकी संस्थेचे अध्यक्ष या नात्याने खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज सुपूर्द केली.
7 / 10
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभा केलेल्या या शैक्षणिक क्षेत्रातील बिजाचा आज वटवृक्ष बनला आहे.
8 / 10
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना कालवधीतील आपली जबाबदारी ओळखून राज्य सरकारला रयतच्या माध्यमातून मदत केली.
9 / 10
शरद पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांना हा धनादेश दिला. त्यावेळी दिवाळीच्या शुभेच्छाही देण्यात आला.
10 / 10
शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहले आहे. या पत्रावर मुख्यमंत्री सहायता निधीसाठीची मदत देत असल्याचं म्हटलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे