शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडण्याची चर्चा का होते?; जाणून घ्या, मतदारसंघाचं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 4:59 PM

1 / 10
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे २ गट पडलेत. त्यात खरी राष्ट्रवादी कुणाकडे हा प्रश्न निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. दोन्ही गटाने पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा केलाय. त्याचसोबत एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
2 / 10
नुकतेच अजित पवार गटानं शरद पवार गटासोबत असणाऱ्या खासदारांना अपात्र करावे यासाठी लोकसभा, राज्यसभा अध्यक्ष, सभापतींना पत्र दिले आहे. या पत्रात श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल,वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचा समावेश आहे.
3 / 10
दोन्ही गट आमनेसामने आहेत. त्यामुळे एकमेकांच्या खासदार, आमदारांना अपात्र करा ही मागणी स्वाभाविक असली तरी काही खासदारांची नावे या यादीतून वगळली आहे. त्यात स्वत: शरद पवार, सुप्रिया सुळे आणि तिसरे डॉ. अमोल कोल्हे...
4 / 10
याबाबत पुण्याचे लोकमत संपादक संजय आवटे सांगतात की, अमोल कोल्हे अलीकडे अजित पवारांना भेटले. या भेटीनंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या. राष्ट्रवादीत उभी फूट पडली तेव्हा अजितदादांसोबत आमदार, खासदार गेले. शरद पवारांसोबत फार कमी लोक राहिले.
5 / 10
पवारांसोबत सुप्रिया सुळे, जयंत पाटील, फौजिया खान, वंदना चव्हाण, श्रीनिवास पाटील, जितेंद्र आव्हाड यासारखी मंडळी आहेत. त्यात खासदार अमोल कोल्हे हे नाव चर्चेत होते. कोल्हे अजितदादांसोबत जातील अशी अटकळ होती. परंतु कोल्हेंनी जी भूमिका घेतली त्यामुळे ते शरद पवारांसोबतच राहतील हे स्पष्ट झाले.
6 / 10
परंतु नंतर चित्र बदलत गेले. अमोल कोल्हेंचे काहीतरी वेगळे चाललंय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. शिर्डीत जे महामंथन झाले. हजारा कार्यकर्ते त्या शिबिराला होते. पण त्या शिबिरात कोल्हेंनी पाठ फिरवली. तेव्हापासून ते भाजपासोबत जातील अशी चर्चा झाली. पण ते शरद पवारांसोबत कायम राहिले. परंतु अलीकडच्या काळात कोल्हे शरद पवारांसोबत फारसे दिसत नाहीत.
7 / 10
शरद पवारांचे दौरे झाले, अनेक ठिकाणी सभा झाल्या त्यात कोल्हे दिसले नाहीत. लोकसभेत जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याची भाजपाची व्यूहरचना आहे. शिरूर लोकसभेत अमोल कोल्हेंचे पारडे जड आहे. त्यात अजित पवार गटाकडून थेट कोल्हेंना शिरूर लोकसभा आमच्याकडून लढा अशी ऑफर आहे. त्यामुळे अजित पवारांकडून कोल्हे, भाजपा-शिंदेंची शिवसेना अशी गणिते जुळवून ही जागा पारड्यात पाडून घेण्याचा भाजपाचा इरादा आहे.
8 / 10
शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात भोसरी, शिरुर, हडपसर, खेड, जुन्नर आणि आंबेगाव..आता खेड, हडपसर, जुन्नर आणि आंबेगाव हे चारही आमदार अजितदादांसोबत आहे.भोसरी तिथे महेश लांडगे ते भाजपाचे आहेत. शिरुरमधील १ आमदार ते शरद पवार गटाकडे आहेत. त्यामुळे अशोक पवार वगळता इतर सर्व विरोधी बाकांवर आहे. त्यामुळे याठिकाणी अजितदादांसोबत गेल्यास आपला विजय सुखकर होईल असा अंदाज अमोल कोल्हेंना असावा असंही लोकमत पुणे संपादक संजय आवटेंनी सांगितले.
9 / 10
अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचे ठरवले तर मतदारसंघात आढळराव पाटील हे शिंदे गटाकडे आहेत ते उमेदवार बनू शकतात. हा संघर्ष झाला निश्चित कोल्हे यांची डोकेदुखी वाढू शकते. ते इतकी वर्ष खासदार होते.पण कोल्हे अजित पवारांसोबत गेले तर शिवाजी आढळराव पाटील यांचे आव्हान राहणार नाही.त्यानंतर ही जागा आपल्याला सुटावी असा आग्रह अजितदादा करतील.
10 / 10
शिरूर लोकसभा मतदारसंघात अतुल बेनके, दिलीप मोहिते, दिलीप वळसे पाटील यासारखी दिग्गज मंडळी एकाबाजूला आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जर मतदारसंघ टिकवायचा असेल तर अमोल कोल्हे पुढच्या काळात काय निर्णय घेतील हे पाहणे गरजेचे आहे.
टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा