शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sanjay Raut: ती तीन कारणं, ज्यांच्या आधारावर संजय राऊतांना सुनावली जाऊ शकते १४ दिवसांची ईडी कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 1:59 PM

1 / 8
मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी दिवसभर चाललेल्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. एक हजार कोटींहून अधिकच्या घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांनी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे.
2 / 8
काल दिवसभर राऊत यांची चौकशी केल्यानंतर ईडीने रात्री त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यानंतर आज दुपारी वैद्यकीय तपासणीसाठी राऊत यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जाईल. तिथे राऊत यांना कोठडी मिळते की जामीन याबाबत कोर्ट निर्णय देईल.
3 / 8
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने तीन मुद्दे तयार केले आहेत, ज्यांच्या आधारावर ईडी कोर्टाकडे संजय राऊत यांची कोठडी मागणार आहे.
4 / 8
ईडीकडून करण्यात येत असलेला पहिला दावा म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीमधून संजय राऊत यांना फायदा झाला आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाल्याचाही ईडीचा दावा आहे.
5 / 8
दुसरा मुद्दा म्हणजे प्रवीण राऊतकडून संजय राऊदत यांच्यापर्यंत रक्कम पोहोचल्याचा दावा ईडीने केला आहे. तसेच ईडीजवळ याची कागदपत्रे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे.
6 / 8
तर ईडीकडून उपस्थित करण्यात येत असलेला तिसरा मुद्दा म्हणजे संजय राऊत हे तपासामध्ये सहकार्य करत वाही आहेत. त्यामुळे या तीन मुद्द्यांच्या आधारावर ईडी संजय राऊत यांच्या ईडी कोठडीची मागणी करेल.
7 / 8
दरम्यान, संजय राऊत यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोचक टोला लगावला आहे. रोज सकाळी वाजणारा भोंगा बंद झालाय, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
8 / 8
संजय राऊत यांची अटक म्हणजे महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliticsराजकारण