Sculptures in the market of consumers for the Diwali purchase
दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात झुंबड By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 11:02 PM1 / 6दिवाळी म्हणजे दीपोत्सवाचा सण..या सणाला महालक्ष्मी पूजेसाठी नवे कपडे परिधान केले जातात. म्हणूनच या दिवसाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहात असतो. (फोटो - सुशिल कदम)2 / 6दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईतील विविध ठिकाणच्या बाजारात ग्राहकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. (फोटो - सुशिल कदम)3 / 6घर उजळून टाकणा-या आकाशदिव्यांच्या खरेदीची लगबग आणि विविध रंगीबेरंगी आकाश कंदिलांच्या रोषणाईने बाजार उजळून निघाले आहेत. (फोटो - सुशिल कदम)4 / 6वाढत्या गर्दीमुळे सायंकाळच्या वेळेस बाजारात पाय ठेवायला जागा अपुरी पडतेय.5 / 6आकाशकंदील, दिव्यांच्या माळा आदींबरोबरच कपडे, गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत.6 / 6वेगवेगळ्या कारखान्यामध्ये रांगोळीमध्ये कलर मिसळून पॅकिंगचे काम सुरू झालेले आहे. एकूणच दिवाळी जवळ येईल, तसतशी बाजारपेठ गजबजून जाऊ लागली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications