वृत्तपत्र वाचन बंदी कायद्याचा भंग करून स्थापन झालेलं ग्रंथालय जयंत धुळप , (अलिबाग) आजच्या अत्याधूनीक जगात इंटरनेट, फेसबुक, टय़ूटर, व्हॅाट्सअॅप असा माध्यमातून जगाच्या कोणत्याही कानाकोप:यातून कोणीही, काहीही लिहिलेले आपण क्षणार्थात वाचू शकतो अशा परिस्थितीत शंभर वर्षापूर्वी ‘सामुहिक वाचनास बंदी’ होती अस कुणी सांगीतल तर त्यावर आजची पिढी कदाचित विश्वस ठेवायला तयार होणार नाही. परंतू शंभर वर्षापूर्वी वास्तव होते. भारत पारतंत्र्यात असताना वाचन, सामुहीक वाचन, अभिव्यक्ती, विचार या सर्व स्वातंत्र्यावर तत्कालीन ब्रिटीश सरकारची बंदी होती आणि तसे कुणी केले तर तो राजद्रोहाचा गुन्हा मानला जात असे व संबंधीत व्यक्तीही शिक्षेस पात्र ठरत असे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यांतील आगरी समाजाच्या शहाबाज गावांत तत्कालीन आगरी युवकांनी विचार स्वातंत्र्य मिळवण्याच्या हेतूने 3 एप्रिल 1916 रोजी सार्वजनीक वाचनालयाची स्थापना करुन आपल्या स्तरावर ब्रिटीश सरकार विरुद्ध असहकार आंदोलनाची मूहूर्तमेढच रोवली. तेच शहाबाज वाचनालय पारतंत्र्य ते स्वातंत्र्य अशा वाचन व विचार चळवळीचा तब्बल 1क्क् वर्षाचा यशस्वी प्रवास यंदा पूर्ण करीत असून त्या निमीत्ताने शनिवार दि.7 व रविवार दि.8 मे 2016 रोजी याच वाचनालयाचा शतसांनत्सरिक महोत्सव संपन्न होत आहे. वृत्तपत्र वाचन बंदी कायद्याचा भंग करून सन 1910 मध्ये वाचन चळवळीचा श्री गणेशा पारतंत्र्याच्या काळातील या वाचन चळवळीच्या जन्माची कहाणी मोठी रोचक आहे. शहाबाज गावामध्ये शिक्षण प्रेमी मंडळींच्या प्रयत्नाने सन 1865 मध्ये मराठी प्राथमिक शाळा सुरु झाली. जनता शिक्षीत होऊ लागली. शिक्षणाचा प्रसार वाढू लागला होता. पारतंत्र्याचा काळ होता सामुहिक वाचनाला बंदी होती. गावातील शिक्षीत तरु णांना आपल्या बांधवाना शिक्षणाबरोबर चालू घडामोडी कळाव्यात असे वाटत होते. त्याच प्रेरणोतून 1910 साली गांवच्या भैरवनाथाच्या मंदिरात वाचन मंडळाची स्थापना झाली आणि तेथेच वाचन चळवळीचा श्री गणोशा झाला. वृत्तपत्न वाचन बंदी कायद्याचा भंग करून वृत्तपत्नाचे प्रथम वाचन करण्याचे धाडस कमळ विठू पाटील या तत्कालीन हुशार विद्यार्थ्याने केले. म्हणून कमळ विठू पाटील यांना शहाबाज वाचन चळवळीचे जनक मानले जाते. वाचन चळवळ जोमाने वाढू लागली. भैरवनाथाच्या मंदिरात जागा अपुरी पडू लागली म्हणून काशिविश्वराच्या मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदा दि.3 एप्रिल 1916 रोजी विठोबा राघोबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वाचनालय शहाबाज संस्थेची स्थापना झाली. विठोबा राघोबा पाटील वाचनालयाचे पहिले अध्यक्ष शहाबाज वाचनालयाची स्थापना झाली. पहिल्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून व्यवसायाने खोत असणारे विठोबा राघोबा पाटील यांची निवड करण्यात आली. बाळा जानू पाटील (उपाध्यक्ष),हरी जोमा पाटील(सचिव),कमळ विठू पाटील(खजिनदार) तर कमळ राघो पाटील,नारायण जाखू भगत,नथू राघो बैकर हे सदस्य असे पदाधिकारी होते. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्नी बाळासाहेब खेर यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्धाटन काशिविश्वेश्वराच्या मंदिरात 1916 सालापासून सुरु असलेल्या वाचनालयास पुस्तक खरेदीसाठी व इतर साहित्य खरेदीसाठी मंगळराव रामजी म्हात्ने (मुंबई)यांनी भरीव आर्थिक मदत केली, त्यामुळे 1926 सालापर्यंत वाचनालय हे सार्वजनिक वाचनालय ‘मंगळराव मोफत वाचनालय शहाबाज’ या नावाने ओळखले जायचे. दरम्यानच्या काळात वाचन चळवळीने अधिक जोर धरला. लोकांना वाचनाची गोडी लागली. ग्रंथ, वर्तमानपत्ने, नियतकालिके आणि इतर साहित्य ठेवायला जागा अपुरी पडू लागली. वाचक वर्ग वाढला. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने वाचनालयाची स्वतंत्न इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. सन 1928 मध्ये नारायण जाखू भगत व तुकाराम जाखू भगत या दानशूर बंधुंनी स्वखर्चाने वाचनालयाच्या स्वतंत्न इमारतीचा पाया बांधून दिला. सन 1917 मध्ये स्थापन झालेल्या विद्यार्थी मंडळाने वाचनालयाच्या इमारतीसाठी लोकवर्गणी, देणगी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला आणि श्रमदान करून ग्रामस्थांच्या सहकार्याने इमारतीचे काम पूर्ण केले. या इमारतीचे उद्घाटन सन 1937 त्यावेळच्या मुंबई राज्याचे मुख्यमंत्नी बाळासाहेब खेर यांच्या शुभहस्ते झाले. विद्यमान लोकप्रतिनिधींचे वाचनालयास सहकार्य आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र काशिनाथ पाटील (आर. के. पाटील) यांच्या प्रयत्नाने वाचनालयाची 6 फेब्रुवारी 1929 रोजी संस्था नोंदणीकृत करण्यात आली. सन 1929 पासून 2008 पर्यंत वाचनालय याच इमारतीत सुरु होते. कालांतराने ही इमारत मोडकळीस आल्याने आमदार जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून नवीन इमारत बांधण्यात आली. या नुतन इमारतीचे उद्घाटन तत्कालीन रायगड जि.प.अध्यक्ष पंडित शेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बाल आणि महिला वाचक विभागातून वाचन चळवळ गतीमान नवा वाचक तयार झाला पाहीजे या हेतूने, ‘बालवाचन विहार ’ हा बाल विभाग सुरु करण्यात आला. जेष्ठ समीक्षक डॉ. म. सु. पाटील यांनी त्यांच्या पत्नी कै. सौ. विभावरी मधुकर पाटील यांच्या नावाने संस्थेस दिलेल्या भरीव आर्थिक सहकार्यातून कपाटे आणि भरपूर पुस्तके दिल्याने या बालविभागाचे नामकरण कै. सौ. विभावरी मधुकर पाटील बालवाचन विहार असे करण्यात आले. बाल वाचकां बरोबर महिलांमध्ये वाचन चळवळ रुजवण्याकरीता सन 2012 मध्ये वाचनालयात स्वतंत्न महिला विभाग सुरु करण्यात आला. सन 1997 मध्ये शानाच्या ‘ड’वर्गात असणारे हे वाचनालय सन 2006 मध्ये ‘क’ वर्गात तर सन 2011 पासून ‘ब’वर्गातील वाचनालय आहे. उत्तरोतर प्रगतीकडे वाटचाल करीत असलेल्या या शहाबाज वाचनालयाची दखल शासनाने अलिकडेच घेवून शासकीय ग्रंथोत्सवात रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्या हस्ते 100 वर्षांच्या अविरत सेवेबद्दल वाचनालयास गौरविण्यात आले. वाचनालयात लवकरच स्वतंत्न स्पर्धा परिक्षा विभाग व आभासी वर्ग सुरु करण्यात येणार असल्याचा मनोदय संस्थेचे विद्यमान अध्यक्ष गोपीनाथ तुकाराम पाटील यांनी व्यक्त केला आहे.