By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 11:04 IST
1 / 5जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुप आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची प्रकट मुलाखत घेतली.2 / 5बृहन्ममहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात सुमारे दोन तास रंगलेली ही मुलाखत ऐकण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.3 / 5महाराष्ट्र आणि देशातील राजकारणावर पवार यांना बोलते करताना राज यांनी आपल्या प्रशांचा सगळा रोख मराठी माणूस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच ठेवला.4 / 5यशवंतराव चव्हाणांच्या पिढीचे मूल्याधिष्ठित राजकारण सध्या दिसत नाही, या राज यांच्या प्रश्नावर पवार यांनी थेट मोदींवर हल्ला चढविला. 5 / 5मुलाखतीच्या शेवटी रॅपिड फायर प्रश्नावर ‘राज की उद्धव?’ अशी गुगली राज ठाकरे यांनी टाकली. मात्र जागतिक क्रिकेटचा अनुभव असलेल्या पवारांनी ‘ठाकरे घराणे’ असे उत्तर देत राज यांचा चेंडू सीमापार टोलविला.