Sheep Farming business can turn farmers into lakhpati at low cost; Government also gives subsidy
कमी खर्चात शेतकऱ्यांना लखपती बनवू शकतो 'हा' व्यवसाय; सरकारही देते सब्सिडी By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 7:11 PM1 / 7देशातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी मेंढ्या पाळतात. या मेंढ्यांची लोकर लोकर आणि चामड्यापासून अनेक उत्पादने बनवण्यासाठी वापरली जाते. याशिवाय त्यांचे दूधही बाजारात चांगल्या दराने विकले जाते. सध्या हा व्यवसाय शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.2 / 7गायी, म्हशी आणि शेळ्यांच्या तुलनेत मेंढीपालन खूप सोपे आहे. मेंढ्या मुख्यतः हिरवे गवत आणि पाने खातात. त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी इतका खर्च येत नाही. सध्या देशात मालपुरा, जैसलमेरी, मंडियान, मारवाडी, बिकानेरी, मारिनो, कोरिडियल रामबुटू, छोटा नागपुरी शाहाबाद प्रजातींच्या मेंढ्यांचा कल अधिक आहे.3 / 7राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मेंढीपालनासाठी केंद्र सरकारकडून ५० टक्के अनुदान दिले जाते. याशिवाय अनेक राज्य सरकारे आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांना मेंढीपालनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देतात.4 / 7केवळ एक लाख रुपयांपासून शेतकरी मेंढीपालन सुरू करू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाजारात एक मेंढी तीन ते आठ हजार रुपयांना विकली जाते.अशा प्रकारे मेंढ्या पाळल्यास शेतकरी कमी खर्चात अधिक नफा कमवू शकतो.5 / 7मेंढीपालन हा ग्रामीण भागातील लोकांसाठी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मानला जातो. त्याची लोकर, मांस आणि दूध विकून बाजारात चांगला नफा मिळवता येतो, याशिवाय मेंढीचे शेण हे देखील एक अतिशय चांगले खत मानले जाते. त्याच्या वापराने शेतमालाची उत्पादकता वाढू शकते.6 / 7मेंढ्यांच्या शरीरापासून खूप मऊ आणि लांब लोकर मिळते. त्याच्या लोकरीपासून अनेक प्रकारचे कपडे बनवले जातात. अशा परिस्थितीत चांगला नफा मिळवण्यासाठी शेतकरी एका मेंढीचा वापर अनेक प्रकारच्या व्यवसायांसाठी करू शकतात.7 / 7राज्यात मेंढीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी ७५ टक्के अनुदानावर मेंढीगटाचे वाटप करण्याची नवीन योजना २०१७ मध्ये सुरू करण्यात आली आहे. ही योजना भटक्या जमातीतील क प्रवर्गाला लागू आहे. यात २० मेंढ्या आणि १ मेंढा नर असं वाटप केले जाते. यात ७५ टक्के शासनाचा आणि २५ टक्के लाभार्थ्यांचा हिस्सा असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications