Shiv Jayanti: Chatrapati Shivaji Maharaj birth anniversary at Shivneri fort
शिवजयंती : शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; राज्यभरातून शिवप्रेमी दाखल By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 2:11 PM1 / 5संपूर्ण देशभरात आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्सहाने साजरी करण्यात आली. शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर देखील मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा केला.2 / 5लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी आणि तरुणांना एकत्र करण्यासाठी गणेशोत्सवाप्रमाणेच शिवजयंतीची देखील सुरुवात केली होती. त्यांनी सुरु केलेली ही परंपरा आज देखील प्रचंड जल्लोषात साजरी केली जाते. यावेळी वेगवेगळ्या गड-किल्ल्यांवर शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव साजरा केला जात आहे.3 / 5शिवनेरी, रायगड, सिंहगड, प्रतापगड, राजगड, पन्हाळा यासारख्या अनेक किल्ल्यांवर पहाटेपासूनच उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं.4 / 5शिवजयंतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवनेरी किल्ल्यावर देखील संगीत, पोवाडे यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.5 / 5'जय भवानी, जय शिवाजी' जयघोषाने सारा आसमंत दुमदुमला. शिवरायांना मानाचा मुजरा केला जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications