Shiv Sainik to Opposition Leader...! Political journey of Congress leader Vijay Vadettiwar
शिवसैनिक ते विरोधी पक्षनेता...! काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा राजकीय प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 2:08 PM1 / 10राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी अखेर विजय वडेट्टीवार यांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही निवड रखडली होती. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वडेट्टीवारांना त्यांच्या आसनापर्यंत आणले. 2 / 10विजय वडेट्टीवारांना दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाली आहे. याआधी २०१९ निवडणुकीपूर्वी वडेट्टीवार यांच्यावर ही जबाबदारी पक्षाने सोपवली होती. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला होता. 3 / 10काँग्रेसचे अभ्यासू, आक्रमक नेते आणि विदर्भातील ओबीसी चेहरा म्हणून विजय वडेट्टीवार यांची ओळख आहे. मुळचे चंद्रपूरच्या गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हे त्यांचे गाव. विद्यार्थी चळवळीपासून वडेट्टीवार यांची राजकीय राजकारणाला सुरुवात झाली. 4 / 10विदर्भात भाजपाचं प्राबल्य असताना याठिकाणी शिवसेनेतून विजय वडेट्टीवार यांनी नवी ओळख निर्माण केली. काही काळ त्यांनी गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणूनही काम केले. मूळचे शिवसैनिक असलेले वडेट्टीवार नारायण राणेंच्या बंडानंतर त्यांच्यासोबत पक्षातून बाहेर पडले. 5 / 10नारायण राणेंसह जे समर्थक आमदार शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले त्यात वडेट्टीवार यांचा समावेश होता. विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसमध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. चंद्रपूर-गडचिरोली जिल्हयात काँग्रेसच्या राजकारणात वडेट्टीवारांचा दबदबा वाढतच गेला. 6 / 10१९९१ ते ९३ या काळात ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य होते. १९९८ ते २००४ या काळात ते विधान परिषदेवर आमदार होते. २००४ मध्ये चंद्रपूरातील चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर राणेंसोबत ते काँग्रेसमध्ये गेले. 7 / 10२००८-०९ काळात जलसंपदा राज्यमंत्रिपदाचा कारभार विजय वडेट्टीवार यांनी सांभाळला. त्याशिवाय आदिवासी विकास, पर्यावरण, वन ही खाती त्यांच्याकडे होती. २००९ मध्ये दुसऱ्यांदा ते विधानसभेवर निवडून आले. २०१० मध्ये अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. 8 / 10२०१४ मध्ये ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून विजय वडेट्टीवार भरघोस मतांनी विजयी झाले. त्यानंतर काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदाची माळ त्यांच्याकडे आली. दरम्यानच्या काळात विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद आले. 9 / 10गेल्या १५ वर्षाच्या काळात विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसमध्ये वेगळे स्थान निर्माण केले. कोअर कमिटीत वडेट्टीवार होते. मविआ सरकारच्या काळात विजय वडेट्टीवार यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले परंतु मनासारखे खाते न मिळाल्याने ते नाराज असल्याचे समोर आले होते. 10 / 10दरम्यान, विरोधी पक्षनेतेपद मिळणे संधी असते. जनतेचा विश्वास विजय वडेट्टीवार सार्थ ठरवतील असा विश्वास आहे. सतत आक्रमक कार्यकर्ता म्हणून वडेट्टीवार यांची ओळख आहे. विदर्भात शिवसेना वाढवण्याचे काम वडेट्टीवार यांनी केले. १९९८ ते २०२३ पर्यंत २५ वर्षाची विधिमंडळाची कारकिर्द त्यांची आहे असं कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आणखी वाचा Subscribe to Notifications