शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

"तुम्हाला रायगडमध्ये फिरु देणार नाही"; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांचा सुनील तटकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 19:40 IST

1 / 7
महायुतीकडून पालकमंत्रिपदासाठी आदिती तटकरे यांची निवड करण्यात आली होती. मात्र आदिती तटकरेंच्या निवडीला शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. यानंतर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे.
2 / 7
मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपद मिळावं यासाठी रायगडच्या शिवसेनेच्या दोन्ही आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना आमदार महेंद्र साळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराच दिला आहे.
3 / 7
पालकमंत्रीपदाच्या वादावरुन आमदार महेंद्र साळवी यांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रोटोकॉलनुसार पालकमंत्रिपद हे भरत गोगावलेनाच मिळायला हवे होते. मात्र तटकरे यांनी गोगावले यांचे नाव यादीतून हटवण्यासाठी त्यांची जादू चालवलीय. यादीतून नाव गायब करणे हा तटकरे यांचा स्वभाव आहे, अशी टीका महेंद्र साळवी यांनी केली.
4 / 7
सुनील तटकरे यांना भरत गोगावले हे मंत्री झाले तर पालकमंत्री निश्चित होणार हे माहित झालं होतं. त्यामुळे त्यांनी पालकमंत्री पद खेचून आणलं. पण आमच्या आक्रोशानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती आणली. आम्ही आता आशावादी आहोत की येणाऱ्या चार दिवसात भरत गोगावले पालकमंत्री होतील, असं महेंद्र साळवी म्हणाले.
5 / 7
भरत गोगावले यांचे नाव यादीतून वगळल्यानंतर रायगडमध्ये मोठा उठाव झाला. हा आमचा आणि लोकांचा उद्रेक होता. गोगावले हे पालकमंत्री पदाचे दावेदार असतानासुद्धा तटकरेंनी आपल्या झोळीतच दान टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र आता कधीच असे होणार नाही. कारण सुनील तटकरे यांची झोळी फाटली आहे, असंही महेंद्र साळवी म्हणाले.
6 / 7
'सुनील तटकरेंचा इतिहास महाराष्ट्राला माहीत आहे.तटकरे जरी पालकमंत्री पद खेचून आणण्यात यशस्वी झाले असले तरी ते येणाऱ्या काही दिवसात अयशस्वी ठरतील. आता कितीही काही झाले तरी येणाऱ्या काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत योग्य निर्णय घेतील,' असं साळवींनी म्हटलं.
7 / 7
'लोकसभेच्या वेळी आम्ही सगळ्यांनी सुनील तटकरे यांच्यासाठी काम केले. तटकरे यांच्याबद्दल आमच्या मनात निगेटिव्हीटी होती. पण आम्ही पॉझिटिव्ह होऊन त्यांना निवडून दिले. मात्र नेहमीप्रमाणे सुनील तटकरे यांनी त्यांची रणनीती तयार करून आम्हाला दगा दिला. येणाऱ्या काळात सुनील तटकरे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही,' असा इशारा महेंद्र साळवी यांनी दिला.
टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेRaigadरायगडEknath Shindeएकनाथ शिंदे