Shiv Sena MLA Viplav Bajoria's house raided by bogus IB officer, police arrested
शिवसेना आमदाराच्या घरावर धाड पडली अन् खळबळ माजली; काही वेळाने खुलासा झाला अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 10:23 PM1 / 10गेल्या काही महिन्यांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या वेगवेगळ्या धाडी पडत आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या कारवायांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येतात. महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग केला जातो असा आरोप सत्ताधारी भाजपावर करत असतात. 2 / 10अलीकडच्या काळात वाढलेल्या तपास यंत्रणेच्या कारवाईचा फायदा घेत चक्क शिवसेनेच्या आमदारालाच गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. अकोलातील शिवसेना आमदार विप्लव बजोरिया आणि तीनदा आमदार राहिलेले गोपी किशन बजोरियांची फसवणूक झाल्याचं उघड झाले. 3 / 10बजोरिया यांच्या बंगल्यात एक व्यक्ती स्वत:ला आयबी अधिकारी असल्याचं सांगत घुसला. कुटुंबाला त्याने समोर बसवलं आणि सर्व संपत्तीची कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. आयबी अधिकाऱ्याने बंगल्यात कारवाई केल्याची चर्चा पसरल्याने सगळीकडे खळबळ उडाली. 4 / 10मात्र थोड्याच वेळात आमदाराच्या कुटुंबाला त्या व्यक्तीच्या हालचालींवर संशय आला. त्यानंतर हळूहळू त्याची खरी ओळख बाहेर आली. हा आयबी अधिकारी असल्याचा बतावणी करत थेट आमदाराच्या घरात घुसला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांनी माहिती दिली. 5 / 10सध्या पोलिसांनी या बोगस अधिकाऱ्यावर कारवाई करत अटक केली आहे. एका आलिशान गाडीतून तो व्यक्ती आला आणि थेट कुणालाही न विचारताच आमदाराच्या बंगल्यात घुसला. गाडी पार्क केली आणि घरच्यांसमोर सोफ्यावर येऊन बसला. 6 / 10मी आयबी अधिकारी आहे. तुमच्याकडे जितक्या गाड्या आणि घरं आहेत त्यांची कागदपत्रे दाखवा. सर्वकाही माझ्यासमोर हवं आहे अशी धाक त्याने कुटुंबावर दाखवली. अगदी फिल्मी स्टाइलमध्ये त्याने कुणालाही थांगपत्ता न लागता हे नाटक करत होता. 7 / 10परंतु काही वेळाने त्याची खरी ओळख बाहेर आली. त्यानंतर आमदाराच्या कुटुंबातील सदस्यांनी या बोगस व्यक्तीला पकडलं आणि पोलिसांना फोन करून तात्काळ बोलावलं. पोलिसही घटनास्थळी हजर झाले त्यांनी या बोगस व्यक्तीला अटक केली. 8 / 10बजोरिया कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केली. हा बोगस अधिकारी ३२ वर्षाचा आहे. तो अकोल्यातील राहणारा आहे. मुर्तिजापूर येथील रोडवर बजोरिया यांचे कार्यालय आहे. गुरुवारी ३१ मार्चला सकाळी ८ वाजता प्रतिक गावंडे कार घेऊन थेट बंगल्यात घुसला. 9 / 10आयबी अधिकारी असल्याची बतावणी करत त्याने आमदारांच्या घरच्यांना घरं आणि बंगल्याची कागदपत्रे दाखवण्यास सांगितली. त्यावर यश बजोरिया या आमदाराच्या कुटुंबातील सदस्याला संशय आला. मात्र तोवर बोगस अधिकाऱ्यांनी धाक दाखवत २ गाड्यांच्या चाव्या घेतल्या होत्या. 10 / 10संशय येताच यशने अधिकाऱ्याकडे ओळखपत्र मागितले. परंतु त्याने देण्यास नकार दिला. नाव विचारलं तेव्हा प्रतीक गावंडे सांगितले. तो बंगल्यातील रुममध्ये जाण्याचा प्रयत्न करताच त्याला विरोध केला तेव्हा कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ केली. तेव्हा यशने पोलिसांना माहिती दिली. हा आरोपी मानसिक तणावाखाली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications