शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शिवसेनेची भाजपवर कडी! विधानसभा निवडणुकाचा सर्व्हे केला, एवढ्या जागा अनुकूल असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:50 AM

1 / 7
महायुतीतील सगळे पक्ष एकत्र आले तर आपण 160 नाही 200 पार करू असे वक्तव्य राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. अशातच एकनाथ शिंदे शिवसेनेचा विधानसभा निवडणुकीसाठीचा अंर्गत सर्व्हे आला आहे. लोकसभेला भाजपाने त्यांचा अंतर्गत सर्व्हेचे घोडे नाचवत शिंदे गटाला आणि अजित पवार गटाच्या खासदारांचे पत्ते कापले होते. यामुळे विधानसभेला तिन्ही पक्षांनी आपापले सर्व्हे करण्याचे ठरविले होते. या नव्या सर्व्हेतून शिवसेनेने एकप्रकारे भाजपवर कडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
2 / 7
लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्याच महिन्यात भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये 288 विधानसभा जागांपैकी पक्षाला केवळ 55 ते 65 जागाच मिळू शकतात असे समोर आले होते. तर भाजपाचे नेते १५० जागा लढण्याची तयारी करत आहेत. असे असताना शिंदेंच्या शिवसेनेने आपल्याला १७७ जागा अनुकूल असल्याचा सर्व्हे आणला आहे.
3 / 7
शिंदेंना लाडकी बहीण योजनेने दिलासा मिळत असल्याचे या सर्व्हेत दिसत आहे. या योजनेतून महिलांना महिना १५०० रुपये आणि वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी राज्यातील जवळपास दीड कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. त्यांच्या खात्यावर १७ ऑगस्टला पैसे येणार आहेत.
4 / 7
२८८ जागांपैकी भाजपा १५० जागा लढविण्यावर ठाम आहे. यामुळे उरलेल्या जागांवर महायुतीचे दोन मुख्य पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीला समाधान मानावे लागणार आहे. लोकसभेला भाजपाने जशी वाताहात केली तशी पुन्हा नको म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रयत्न करणार आहेत. तिघेही एकत्र लढत असले तरी लोकसभेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे खासदारांचे तिकीट कापण्यात आले होते. यासाठी भाजपाने ते पुन्हा निवडून येणार नाहीत, असे सर्व्हेत दिसत असल्याचे सांगत दबाव टाकला होता.
5 / 7
भाजपाचा सर्व्हे गेल्याच महिन्यात आला होता. आता शिवसेनेचा आला आहे. हे दोन्ही अधिकृत जाहीर झालेले नसले तरी सुत्रांनी माध्यमांना याची माहिती दिलेली आहे. भाजपाचा सर्व्हे इंडियन एक्स्प्रेस आणि शिवसेनेचा सर्व्हे एबीपीने दिलेला आहे. यामुळे आता राष्ट्रवादीचा सर्व्हे काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
6 / 7
राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असे सर्वत्र मानले जात असताना ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळीनंतरच होईल, अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे. आधी २० सप्टेंबरला निवडणूक जाहीर केली जाईल असे बोलले जात होते. परंतू, नव्या माहितीनुसार गेल्या निवडणुकीत राजकीय नाट्ये घडल्याने सत्तास्थापनेला झालेला उशीर यामुळे नवीन विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात येणार आहे.
7 / 7
सणासुदीच्या तोंडावर निवडणूक घेण्याऐवजी दिवाळीनंतर ती घ्यावी, असा सत्तारुढ महायुतीमध्येदेखील सूर आहे. ६ नोव्हेंबरपूर्वी ४५ दिवस म्हणजे १२ ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली तरी विहित कालमर्यादेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दिवाळी ३ नोव्हेंबर रोजी संपेल. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होईल. १४ किंवा १५ नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचे पहिले अधिवेशन बोलावण्याकरिता त्यानंतर १२ दिवस हाती असतील.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४