शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा थरार; डॉ अमोल कोल्हेंचे बोलके फोटो पाहून येईल अंगावर शहारा !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 10:20 AM

1 / 7
शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग सध्या महाराष्ट्रात विविध शहरात होत आहेत. यामागे किती कष्ट आहेत हे अमोल कोल्हे यांच्या फोटोंमधून दिसते. महाराष्ट्राला स्वराज्या रक्षक संभाजी कळावे यासाठी हा प्रयत्न आहे.
2 / 7
या महानाट्याचा थरार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी रसिक प्रेक्षक गर्दी करत आहेत. अमोल कोल्हे यांनी नाटकात छत्रपती संभाजी महाराज यांची भुमिका साकारली आहे तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे.
3 / 7
हे महानाट्य बघायला येणारे कुटुंब आवर्जुन आपल्या लहान मुलांना घेऊन येत आहेत.या महानाट्याच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रती आदर निर्माण व्हावा, स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले बलिदान या भावी पिढीपर्यंत पोहोचावे हा प्रयत्न आहे.
4 / 7
म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या प्रसंगानंतर काही मिनिटांतअमोल कोल्हे पुन्हा शंभुराजांचा पेहराव करत घोड्यावरुन प्रेक्षकांसमोर येतात तो क्षण अंगावर शहारे आणणारा असाच आहे.
5 / 7
महानाट्यातील अनेक बोलके फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अमोल कोल्हे यांनी यापूर्वी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे. आता त्यांना प्रत्यक्ष नाटकात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बघून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
6 / 7
अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेमुळे ते लहान मुलांमध्येही प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. याचा प्रत्यय आपल्याला अनेक फोटोंमधून येतो. अनेकदा लहान मुलं बाल शिवाजीचा पेहराव करुन नाटक बघायला येतात तेव्हा खूप छान वाटते.
7 / 7
राजेंच्या रुपाने अभिनय करावा तो डॉ अमोल कोल्हे यांनीच अशी प्रतिक्रिया सरिक प्रेक्षक देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की अमोल कोल्हे यांनाच पडद्यावर पाहण्याची इच्छा असते. सौजन्य : Deepak Darje Photography
टॅग्स :Marathi Actorमराठी अभिनेताSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती