Should India have EVMs or should they be banned? What the survey says
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो? By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 2:24 PM1 / 8भारतात कोणत्याही निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमबद्दल संशयाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी येतो. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतरही तेच घडलं आहे. ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षातील नेतेही याबद्दल शंका व्यक्त करत आहेत.2 / 8या मुद्द्यावर जुलै २०२४ मध्ये युगव्हर्मेंट-मिंट सीपीआर मिलेनियल सर्वेक्षण करण्यात आले होते. यात भाजप, काँग्रेसच्या समर्थकांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्याचबरोबर कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या लोकांची मतेही जाणून घेण्यात आली होती.3 / 8भारतामध्ये मतदानासाठी ईव्हीएमच असावे, तसेच त्यामध्ये छेडछाड होत असल्याचा आरोप खोटा असल्याचे मत ६१ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. तर ३९ टक्के लोकांनी ईव्हीएम बंद करून त्याऐवजी बॅलेट पेपर प्रणाली पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.4 / 8या सर्वेक्षणात १०,३१४ लोकांनी सहभाग घेतला. यातील ४६ टक्के भाजप समर्थक होते, तर १५ टक्के काँग्रेस समर्थक होते. २० टक्के कोणत्याही पक्षाशी संबंधित नव्हते आणि इतरांनी इतर पक्षांना पाठिंबा दिला होता.5 / 8७१ टक्के भाजप समर्थकांचं म्हणणं होतं की, ईव्हीएम असावे. तर २९ टक्के भाजप समर्थकांचं म्हणणं होतं ईव्हीएम बंद करावे.6 / 8दुसरीकडे ४६ टक्के काँग्रेस समर्थकांचं म्हणणं होतं की, ईव्हीएम असावे, तर ५४ टक्के समर्थकांचं म्हणणं होतं ईव्हीएम नसावे. म्हणजे काँग्रेसमधून ईव्हीएम विरोध जास्त दर्शवला गेला.7 / 8इतर पक्षाचे समर्थक असलेल्या ५४ टक्के लोकांचं म्हणण होतं की, ईव्हीएम असावं, तर ४६ टक्के लोकांचं म्हणणं होतं ईव्हीएम बंद व्हावं.8 / 8कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेल्या ५७ टक्के लोकांनी ईव्हीएम असावे, अशी भूमिका मांडली. तर ४३ टक्के लोकांचं म्हणणं होतं ईव्हीएम बंद व्हावं. आणखी वाचा Subscribe to Notifications