छत्रपती शिवरायांचे वंशज रायगड किल्ल्यावरील झोपडीत विसावा घेतात तेव्हा... By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 8:43 AM
1 / 7 आता देखील रायगड किल्ल्यावरील संभाजीराजेंचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2 / 7 खासदार छत्रपती संभीजीराजे यांचे गडप्रेम संपूर्ण राज्याला माहित आहे. संभाजीराजे यांना अनेकवेळा निवांत क्षणी गड-किल्ले चढताना आणि त्यांचा सान्निध्यात आनंद लुटताना पहिले आहे. 3 / 7 संभाजीराजे सोमवारी सकाळी रायगडावर सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी करण्याकरिता गेले होते. ते दुपारी १२ वाजेच्या सुमारास गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यांनी गडावरील कामकाजांची संपूर्ण पाहणी केली. सध्या गडावरील रोप वे बंद आहे. त्यामुळे संभाजीराजे ह्यांनी स्वतः पायऱ्या चढूनच सर्व कामांची पाहणी केली. 4 / 7 डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि रायगड सर करुन संभाजीराजे थकले. आणि त्यांनी चक्क रायगडावर असलेल्या एका झोपडीत थोडावेळ आराम केला. यावेळी त्यांनी अगदी सर्वसामान्यांप्रमाणे जमिनीवर झोपूनच विश्रांती घेतली. 5 / 7 संभाजीराजे यांचा रायगडावर एका झोपडीत विश्रांती करत असल्याचे क्षण त्यांचे स्वीय साहाय्यक केदार योगेश यांनी कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला. साधेपणा आणि जमिनीशी जवळीक बघून सर्वच जण अगदी भारावून गेले आहेत. 6 / 7 संभाजीराजे यांनी देखील आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटरद्वारे या दौऱ्याबाबत संपूर्ण माहिती दिली. कोल्हापूरहून रायगडास निघालो. साधारण १२ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर नाणे दरवाजामार्गे गड चढून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. 7 / 7 लॉकडाऊनमुळे रोपवे बंद आहे, अशा परिस्थितीत प्राधिकरणाचे अधिकारी दररोज गड पायी चढतात. रखरखत्या ऊन्हात देखील गडावरील सर्व कामे अविरतपणे सुरू आहेत. रायगड प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग घेत असलेल्या मेहनतीस प्रोत्साहन देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. वेळोवेळी रायगडास भेट देऊन सुरू असलेल्या कामांवर लक्ष देत असतो, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. आणखी वाचा