Special Memorial Day of gopinath munde, devendra fadanvis rembering and homage
स्मृतीदिन : बुद्धीबळाच्या पटावरुन राजाच झालाय वजा... By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 11:04 AM1 / 10 भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिनी असल्याने राजकीय दिग्गजांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. भाजपाच्या दिग्गज नेत्यांकडून त्यांच्या आठवणीही जागविण्यात येत आहेत. 2 / 10काय केली चूक आणि कसली दिली सजा। बुद्धी बळाच्या पटावरून राजाच झाला वजा॥3 / 10भाजप नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाचं अशा शब्दांत वर्णन केले होतं. 4 / 10जून 2014 मधील विधानसभेतील प्रश्नोत्तराचा तास संपताच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांनी राज्यासाठी केलेल्या कार्याबद्दल ‘कृतज्ञता’ व्यक्त करणारा ठराव मांडला. 5 / 10मुंडे यांच्या कार्याचा आढाव घेत असताना त्यांच्यावर लोकांचे किती प्रेम होते, त्यांच्या जाण्याचे दु:ख पचवणे अवघड झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जमावाने कसा उद्वेग व्यक्त केला, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.6 / 10तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी तर आपले अश्रू आवरणेही कठीण झाले. दोनच दिवसांपूर्वी मुंडेंसोबत बैठक झाली. खरे तर ही बैठक नंतर घ्यावी, असे मी म्हणालो होतो. 7 / 10मात्र मुंडे म्हणाले, पुन्हा नको आताच घ्या. पुढे आपल्याला कुठे वेळ आहे, हे त्यांचे शब्द मला अस्वस्थ करतात, असे भावनिक शब्द खडसेंनी त्यावेळी काढले होते. 8 / 10पुढे खडसे बोलत असताना त्यांच्यामागे बसलेले देवेंद्र फडणवीस यांना आपले अश्रू आवरणे अवघड झाल्याने सारखे डोळे पुसावे लागत होते. सभागृहातील अनेकांची अवस्था तशीच झाली होती9 / 10विधिमंडळात गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीनं भावूक होऊन देवेंद्र फडणवीसांनी, बुद्धी बळाच्या पटावरून राजाच झालाय वजा, हे उद्गार काढले होते. 10 / 10शब्द देवेंद्रांच्या मुखातले होते, पण महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेच्या मनातील भावनाच होती ती, लाखो ऊतसोड कामगारांच्या डोळ्यात तरळणाऱ्या अश्रूत दिसणारेही शब्द तेच होते. आणखी वाचा Subscribe to Notifications