Special Supplement of Lokmat on the occasion of Sharad Pawar 80th birthday
Sharad Pawar Birthday : पॉवर @80! शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकमतचा "विशेषांक" By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 10:09 AM1 / 6राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त लोकमतने काढलेला विशेष अंक आज लोकमत मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी शरद पवार यांना सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेटून दिला. वाढदिवसाच्या शुभेच्छाही लोकमतच्या वतीने दिल्या. 2 / 6शरद पवार यांनी बारकाईने अंक पाहिला. आस्थेने लोकमत'च्या कार्याची चौकशीही केली. लोकमतचे मुंबईतील ऑफिस कुठे आहे? कशा पद्धतीने या काळात काम चालू आहे? हे देखील त्यांनी आवर्जून विचारले.3 / 6देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तथा कृषी, उद्योग व क्रीडा विश्वावर अमीट ठसा उमटवणारी सुपर 'पॉवर' म्हणजे शरद पवार.4 / 6आजचा आधुनिक महाराष्ट्र आणि देशाच्या नव्या आर्थिक धाेरणाला आकार देण्यात त्यांचा माैलिक वाटा आहे, त्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. पन्नास वर्षांहून अधिक काळ लाेकशाहीची मंदिरे असलेल्या विधिमंडळ आणि संसदेत अविरत काम करण्याचादेखील त्यांचाच विक्रम आहे. 5 / 6गेल्या अडीच दशकांपासून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळलीच. सर्वांत माेठी कामगिरी त्यांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून केली. सलग दहा वर्षे देशाच्या कानाकाेपऱ्यांत जाऊन तेथील शेती उत्पादन कसे वाढेल, याचा ध्यास घेतला हाेता.6 / 6राजकारणाव्यतिरिक्त क्रीडाक्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी केली. भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची यशस्वी जबाबदारी स्वीकारली. कुस्ती, कबड्डीसारख्या भारतीय खेळांना प्राेत्साहन दिले. मराठी भाषेत इतर भाषांतील साहित्यकृती कशा येतील, यासाठी प्रयत्न केले. आणखी वाचा Subscribe to Notifications