शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

परतीच्या पावसाने राज्यभरात दाणादाण, शेतकऱ्यांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:12 AM

1 / 5
नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडवली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीला पाणी वाढले असून पूर परिस्थती निर्माण झाली आहेत.  (छायाचित्र प्रशांत खरोटे)
2 / 5
नाशिकच्या गोदावरी नदीला आलेल्या पूरामुळे नदीकाठी असलेली मंदिरे अशी पाण्यात बुडाली होती. ( छायाचित्र प्रशांत खरोटे)
3 / 5
परळी (जि. बीड) येथील घनशी नदीपात्रात बुधवारी दोन शाळकरी मुले बुडाली. त्यांना वाचविण्यास गेलेल्या युवकाचा मृत्यू झाला. त्यांचा शोध घेतला जात होता. यावेळी नदीपात्राजवळ मोठा जमाव जमला होता. मदतकार्य सुरूच होते.
4 / 5
मंगळवारी रात्री पावसाने सोलापूर जिल्ह्याला झोडपले. मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे वाहतूक खोळंबली होती. ( छायाचित्र महेश कोटीवाले)
5 / 5
कांदा रोपांचे नुकसान...कांदे लागवडीसाठी शेतात वाफे करून तयार केलेले कांद्याच्या रोपांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. धुळे तालुक्यातील नेर शिवारात वाफ्यांमधील तयार रोपे पावसाच्या माºयाने जमीनदोस्त झाली असून वाफ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ( छायाचित्र संतोष ईशी, नेर)
टॅग्स :Rainपाऊस