शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

यशोगाथा! लाडकी बहीण योजनेच्या पैशातून सुरू केला व्यवसाय; १० दिवसांत १० हजार कमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 2:12 PM

1 / 10
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये सहाय्य करण्यात येत आहे.
2 / 10
जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी झाली असून त्यातून रक्षाबंधनाच्या आधीच २ महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले. लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून यातून सत्ताधाऱ्यांचा जास्तीत जास्त महिला मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे.
3 / 10
सरकारकडून महिलांना दरमहिना १५०० रुपये आर्थिक सहाय्य केले जाते. मात्र एवढ्या कमी पैशात काय होणार, तुम्ही मतांसाठी १५०० रुपये महिलांना लाच देताय का असा सवाल करत विरोधकांनी महायुती सरकारच्या या योजनेवर टीकास्त्र सोडलं होते. मात्र हेच पैसे एका कुटुंबासाठी आधार बनले आहेत.
4 / 10
सरकारकडून मिळणाऱ्या १५०० रुपयांपासून एका कुटुंबाने छोटा का होईना असा व्यवसाय सुरू केला. या लाडक्या बहिणीचं नाव आहे प्रणाली बारड, जिनं इन्स्ट्राग्राम ट्रेंडिगवर असलेली घुंगरू कडी गणेशोत्सवासाठी त्यांच्यासाठी खरेदी केले होते. मात्र त्यातूनच त्यांना एक कल्पना सुचली.
5 / 10
गणेशोत्सव काळात हटके असणाऱ्या आरतीसाठी वाजवल्या जाणाऱ्या घुंगरू कडीची मागणी जोरात होती. प्रणाली यांनी या घुंगरू कडी स्वत:च्या गणपतीसाठी आणल्या. परंतु प्रणाली यांच्या ओळखीचे, शेजारीपाजारी यांनी त्यांच्याकडे या कडीची ऑर्डर दिली.
6 / 10
त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर करत प्रणाली बारड यांनी इन्स्टाग्रामवर रिल टाकली. त्यातूनही अनेक ग्राहकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर स्वामींच्या मठाजवळ, लालबाग मार्केट, गौरीशंकर बाजारपेठेत प्रणाली यांनी या घुंगरू कडी विकल्या.
7 / 10
नुकतेच कॉलेजचं शिक्षण घेतलेली प्रणाली बारड यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ३ हजार रुपये खात्यात जमा झाले होते. या ३ हजारातील १५०० रुपये मी गुंतवणूक केली. या पैशातून मी घुंगरू आणले आणि आरतीसाठी लागणारी घुंगरू कडी बनवायला सुरुवात केली असं तिने सांगितले, ABP ला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.
8 / 10
ऑनलाईनच्या माध्यमातून केवळ मित्र आणि त्यांच्या ओळखीतले संपर्कात येत होते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायचे होते. त्यासाठी गणेशोत्सव काळात खरेदीसाठी जिथे गर्दी असते तिथे गेले, लालबाग, परळ आणि दादरच्या स्वामी मठाबाहेर बसली होती असं प्रणालीने सांगितले
9 / 10
या व्यवसायाबाबत सांगताना प्रणाली बारड हिने सांगितले की, १५०० रुपये जास्त मोठेही नाहीत आणि जास्त छोटेही नाहीत. आपण कुठे गुंतवणूक करतो ते महत्त्वाचे आहे. या १५०० रुपयाचे अनेक फायदे होऊ शकतात जसा मी घेतला आहे. १५०० रुपये गुंतवणूक करून मी १० हजार कमावलेत असं तिने सांगितले.
10 / 10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या या योजनेतून माझा खूप फायदा झाला आहे. त्यांनी मला फक्त ३ हजार दिले त्यातून मी १० हजार कमावलेत. माझं इतरांनाही आवाहन आहे, जर तुमच्या अंगी काही कला असेल तर तुम्ही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवू शकता. थोडीशी हिंमत दाखवून मार्केटिंगमध्ये उतरून व्यवसाय मराठी माणसाने सुरू केलाच पाहिजे असं आवाहन प्रणाली बारड हिने केले आहे.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाEknath Shindeएकनाथ शिंदे